Hospital Logo
Hospital Logo Google
सातारा

रुग्णांच्या नातेवाईकांना असा मिळेल पास; पाेलिसांची माहिती

सिद्धार्थ लाटकर

सातारा : येथील जिल्हा क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय (सिव्हील हाॅस्पिटल) (civil hospital satara) , जिल्हा काेविड रुग्णालय (छत्रपती शिवाजी संग्रहालय) (jumbo covid hospital satara) याबराेबरच जिल्ह्यातील शासकीय काेविड रुग्णालयात असणा-या नातेवाईकांच्या उपचाराची माहिती घेण्यासाठी अथवा तेथे काही लागल्यास देण्यासाठी नातेवाईकांची उपस्थिती असते. काही वेळेला नातेवाईकांची संख्या माेठ्या संख्येने हाेऊ लागल्याने अखेर पाेलिसांनी (satara police) एकच नातेवाईक बंधनकारक केले आहे. त्यासाठी पासची व्यवस्था उभारण्यात आली आहे. (how-to-get-pass-covid19-relatives-visit-jumbo-hospital-satara-police-new-guideliness)

सातारा जिल्ह्यात काेविड 19 रुग्णांची वाढती संख्या लक्षात जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात एक जूनपर्यंत लाॅकडाउनमधील निर्बंध कडक केले आहेत. विनाकारण बाहेर फिरणा-यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बहुतांश वेळा काही लाेक रुग्णालयात नातेवाईक असल्याचे सांगून बाहेर फिरत असल्याची तक्रारी प्रशासनाच्या कानावर येऊ लागल्या. संबंधित व्यक्ती खरे सांगत की खाेटं हे पडताळणी करताना अनेक वेळा लाेक रुग्णालयाची फाईल दाखवत असे. त्यामुळे खरं की खाेटं समजत नसे. परिणामी रस्त्यावर माेठ्या प्रमाणात गर्दी दिसू लागली.

अखेर ही गर्दी कमी करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या एका नातेवाइकाला पास देण्यासाठी पोलिस दलाने यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात दाखल असलेल्या बाधिताच्या एकाच नातेवाइकाला रुग्ण दाखल असेपर्यंत पास मिळवून रुग्णालयात जाता येणार आहे.

खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांसाठी पास देण्यासाठी यंत्रणा पुढील टप्प्यात उभारणार असल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सांगितले. सध्या खासगीत दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाला आवश्‍यकता असल्यास रुग्णालयात जाता येणार आहे.

असा मिळेल पास

ज्या शासकीय काेविड 19 रुग्णालयात रुग्ण दाखल आहे. तेथील व्यवस्थापनास संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाने त्याचे नाव द्यायचे आहे. त्यानंतर संबंधित व्यवस्थापन रुग्णाच्या नातेवाईकास पास देणार आहे. या पासच्या आधारे संबंधित रुग्णाच्या नातेवाईकास रुग्णालय परिसर आणि इतर ठिकाणी आवश्यक गाेष्टींसाठी जाण्यास परवानगी राहील अशी माहिती धुमाळ यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 04 मे 2024

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT