सातारा

टेबललॅण्ड, सिडने पॉईंटसह वेण्णालेकच्या सुशोभिकरणाचा आराखडा तयार; काेट्यावधींचा निधी

अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : महाबळेश्वरच्या पर्यावरणाला धक्का न लावता निसर्गसौंदर्याला शोभेल अशा कामांचा समावेश विकास आराखडयात करा, अशी सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली. महाबळेश्वर व पाचगणी विकास आराखड्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिलेल्या बैठकीत आमदार पाटील बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भरतसिंह हाडा, प्रांताधिकारी संगिता राजापूरकर, जिल्हा प्रशासन अधिकारी सचिन पवार आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाबळेश्वर व पाचगणीच्या विकास कामांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला होता. यामध्ये महाबळेश्वरसाठी 75, तर पाचगणीसाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. पाचगणीचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी पाचगणी शहर विकास आराखडा, तर महाबळेश्वर शहर विकास आराखडा मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी सादर केला. पाचगणी विकास आराखडयामध्ये टेबललॅण्ड चार कोटी, पारसी पॉईंट पाच कोटी, सिडने पॉईंट पाच कोटी, दांडेघर व काच बावडी टोल नाका सहा कोटी, बहुमजली वाहनतळ तीन कोटी वृक्षारोपण व सुशोभिकरण चार कोटी व पाथवे तीन कोटी आदी विकास कामांचा समावेश होता. महाबळेश्वर विकास आराखडयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाष चौक, वेण्णालेक टोलप्लाझा, वेण्णालेक पाथवे व वेण्णालेक येथील स्टॉलचे सुशोभिकरण आदी कामांचा समावेश होता.

मै हूं ना! महाबळेश्वरातील पर्यटकांना गृहराज्यमंत्र्यांचा दिलासा

पालकांनाे थांबा! मुलांना वाहन चालविण्यास देऊ नका, कऱ्हाडला पहा काय झाले
 
पर्यटनस्थळांचा माहिती फलक, स्ट्रिट लाईट, बैठक व्यवस्था, स्वच्छतागृह, एकसारखे स्टॉल, घोडयांसाठी स्वतंत्र ट्रॅक, फुडप्लाझा यांचे डिझाईन करावे. सुरूर अथवा पाचवडपासून प्रतापगडपर्यंत माहीती फलक लावावेत, अशा सूचना आमदार पाटील यांनी केल्या. या वेळी तहसिलदार सुषमा चौधरी, बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी सभापती संजय गायकवाड, रोहीत ढेबे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सार्वजनिक बांधकाम खात्याचे महेश गोंजारी, संदीप मोरे आदी उपस्थित होते.

कदमांचा प्रामाणिकपणा; बॅंक ऑफ महाराष्ट्रात सापडलेले सोन्याचे दागिने, पैसे केले परत

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT