Mhaswad Police Station Crime News esakal
सातारा

Satara Crime : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीनं भिंतीवर डोकं आपटून पत्नीला केलं ठार; पुरावा नष्ट करण्यासाठी मुलांची घेतली मदत

फरशीवर व भिंतीवर पडलेले रक्त मुलगा निखिल व आयुष यांच्याकडून साफ करून घेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सकाळ डिजिटल टीम

धोंडिराम पुकळे याने दारूच्या नशेत चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी दीपालीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

म्हसवड : चारित्र्याच्या संशयावरून दारुड्या पतीने लाथाबुक्क्याने मारहाण करून पत्नीचा खून केल्याची घटना म्हसवड पोलिस ठाण्यानजीकच्या (Mhaswad Police Station) क्रांती सूर्यनगर कॉलनीत घडली. धोंडिराम नाना पुकळे (वय ४०, रा. पुकळेवाडी, सध्या रा. म्हसवड क्रांती सूर्यनगर) असे संशयिताचे नाव आहे.

दीपाली धोंडिराम पुकळे (वय ३२) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. शनिवारी (ता. चार) संध्याकाळी नऊ ते रविवारी (ता. पाच) दुपारी तीनच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत म्हसवड पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धोंडिराम नाना पुकळे याने दारूच्या नशेत चारित्र्याचा संशय घेऊन पत्नी दीपालीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व भिंतीवर व व्यायाम करायच्या डंबेलवर आपटून गंभीर जखमी करून ठार मारले.

फरशीवर व भिंतीवर पडलेले रक्त मुलगा निखिल व आयुष यांच्याकडून साफ करून घेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मृत दीपालीचे वडील आबा कोडलकर यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी संशयित धोंडिराम याला त्वरित अटक केली. घटनास्थळी दहिवडी येथील पोलिस उपअधीक्षक अश्‍विनी शेंडगे यांनी भेट दिली असून, अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT