Ajit Pawar  sakal
सातारा

रुग्ण वाढल्यास पुन्हा कठोर निर्णय घेणार: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे संकेत

जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : कोरोना रुग्णांची संख्या(covid patients) अशीच वाढायला लागल्यास आपल्याही मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे त्यांच्या निर्णयाची प्रत्येक जिल्ह्यात कडक अंमलबजावणी होईल, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार(ajit pawar) यांनी आज पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत येथे पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी येणाऱ्या अर्थसंकल्पात रुग्णालयातील बेडची(hospitals bed) संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न असेल. साताऱ्यासाठी ज्या बाबी लागतील, त्या देण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री पवार आज साताऱ्यात आले होते. या वेळी त्यांनी राष्ट्रवादी भवनाच्या नूतनीकरणाची पाहणी आणि उद्‌घाटन केले. त्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘पश्चिम बंगालमध्ये कोरोनाची संख्या वाढू लागल्याने तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लॉकडाउन केले आहे. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढू लागली तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथे लॉकडाउन करण्यात आले आहे. तसेच आपण ज्यावेळी जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो. त्यावेळी आपण एकमेकांसमोर येतो. त्या वेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो.

नारायण राणेंना अजित दादांचा चिमटा

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीतील यशानंतर नारायण राणेंनी याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करणार असे वक्तव्य केले होते. याविषयी विचारले असता श्री. पवार म्हणाले, ‘‘निवडणुकीत यश-अपयश येतंच असतं. या निवडणुकीत महाविकास आघाडीला बॅकफूटवर जावं लागलं. मात्र, सातारा, सांगली, पुणे या ठिकाणी चांगले यश मिळाले. राणेंनी पुढं काय करावं, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे कसे टिकेल. येणाऱ्या संकटावर मात करून जनतेला योग्य दिशेने कसे नेईल, यासाठी प्रयत्न राहणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार पडेल, अशी चर्चा सातत्यानं केली जात आहे. आता नारायण राणेंच्या रूपानं आणखी एक माणूस आला आहे. खरं तर नारायण राणेंनी मागे असेच सन १९९९ ते २००४ कालावधीत सरकार पाडण्याचा बराच प्रयत्न केला. सहा आमदार फोडले; पण त्यात त्यांना यश आले नाही.’’ त्यानंतर दहा वर्षे सरकार टिकले, याचा दाखला देत उपमुख्यमंत्र्यांनी राणेंचा चिमटा काढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs PAK: मग कसा होता रविवार? इरफान पठाणचा पाकिस्तानला ट्रोल करत भन्नाट डान्स; पाहा Video

Avi Prasad IAS : चर्चित आयएएस अधिकाऱ्याने केले तिसरे लग्न, आधीच्या दोन्ही पत्नी आहेत जिल्हाधिकारी, तिसरी मंत्रालयात उपसचिव

'ती व्यक्ती आपल्यासोबत असली की...' जुई गडकरीच्या लाईफ पार्टनरबद्दल काय अपेक्षा? म्हणाली...'माझ्यासाठी खरं प्रेम हे...'

Success Story: शेतीसंघर्षातून उभी राहिली अधिकारीपदाची स्वप्ने; चिंचमंडळच्या शेतकरी पुत्राची तालुका कृषी अधिकारी पदाला गवसणी

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

SCROLL FOR NEXT