Sharad Pawar vs Shambhuraj Desai esakal
सातारा

शरद पवारांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच देसाईंचं स्पष्टीकरण; म्हणाले, ED कारवाई कोणाच्या सांगण्यावरून नव्‍हे तर..

ईडीच्या कारवाईवरून ज्‍येष्ठ नेते खासदार पवार यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

हेमंत पवार

'ईडी आणि इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राज्य सरकारला आज वाटले आणि उद्या कारवाई केली असे होत नाही.'

कऱ्हाड : ईडी आणि इन्कमटॅक्स (ED and Income Tax) हे स्‍वतंत्र विभाग आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. त्यात राजकीय आणि शासकीय हस्तक्षेप नसतो. ज्‍येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबद्दल बोलण्याएवढा मी मोठा नाही. न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतात. न्यायालय योग्य पद्धतीने दखल घेऊन न्याय देईल, असे मत उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यक्त केले.

ईडीच्या कारवाईवरून ज्‍येष्ठ नेते खासदार पवार यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. त्या प्रश्नावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘‘ईडी आणि इन्कमटॅक्स या स्वतंत्र यंत्रणा आहेत. त्यांना त्यांचे अधिकार आहेत. राज्य सरकारला आज वाटले आणि उद्या कारवाई केली असे होत नाही.

ईडीकडे काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्या तक्रारीची त्यांच्याकडून अगोदर स्वतंत्र चौकशी त्यांच्या सोर्समार्फत केली जाते. त्यातून आवश्यकता वाटली, तर ज्यांच्याविरोधी तक्रार आली असेल त्यांना समन्स देऊन चौकशीला बोलविले जाते. संबंधितांना म्हणणे मांडण्यास संधी दिली जाते. यानंतर त्या तक्रारीत त्या यंत्रणेला तथ्य वाटले, तर ते त्यांच्या अधिकाराप्रमाणे कारवाई करतात.

सरकारला वाटले एखाद्यावर कारवाई करावी, तर ते तसे होत नाही. त्याची प्रोसिजर आहे. त्यामुळे ज्यांना अटक होतात, चौकशीला समन्स दिले जातात त्याची माहिती राज्य सरकारला दिली जाते. मी गृहराज्यमंत्री होतो. त्यामुळे मला माहिती आहे. त्यामुळे राजकीय हस्तक्षेपाने काहीतरी उद्देश ठेवून कारवाई केली जात नाही.’’

दावोस परिषदेनंतर काय केले ते सांगा

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी दावोस परिषदेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. त्यावर बोलताना मंत्री देसाई म्हणाले, ‘‘परकीय गुंतवणूक आणण्यासाठी एखाद्या उद्योजकाला, उद्योगपतीला, त्यांच्या प्रतिनिधी मंडळाला बरोबर घेऊन गेले तर त्याला दलाल म्हणणे योग्य नाही. जी गुंतवणूक राज्यात आणणार आहेत, त्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तर आदित्य ठाकरे त्यांना कोणत्या आधारे दलाल म्हणताहेत. त्यापेक्षा त्यांनी आमदार प्रसाद लाड यांनी यापूर्वी दावोसला गेलेल्या शिष्टमंडळातून केलेल्या काही मान्यवरांनी पाठीमागे दोन-तीन दिवस थांबून काय केले, हे सांगायची वेळ आणू नका असे म्हटले आहे. त्यावर आदित्य ठाकरे यांनी भाष्य करावे आणि मग मुख्यमंत्र्यांबद्दल बोलावे.’’

पिण्याच्या पाण्याला प्राधान्य

पाणीटंचाई तीव्र होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे लागणार असल्याचे सांगून मंत्री देसाई म्हणाले, की पिण्याचे पाणी कमी पडणार नाही याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केल्या आहेत. पहिल्यांदा पिण्याच्या पाण्याचा विचार करून त्यानंतर शेतीच्या पाण्याचा विचार केला जाईल, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026: प्रशिक्षक रिकी पाँटिंगनेच दिलेला वर्चस्व गाजविण्याचा सल्ला, कुपर कोनोलीनं स्पष्टच केला खुलासा

अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी राबवला अनोखा उपक्रम ! मुलींसाठी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात

Viral status Thackeray group : ‘उद्धवरावांची उद्‌ध्वस्त सेना’ ठाकरेंच्या प्रमुख नेत्याच्या स्टेटसने चर्चा, ५ मिनीटात डिलीटही केलं

Akola News: शहरातील ३५ पाण्याच्या टाक्यांची होणार दुरुस्ती; चार झोनमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थापनाचे नियोजन

Nanded Crime: माहूर तालुक्यातील बंद खडी केंद्रावरील गिट्टी साठा बेकायदेशीर; एक कोटी ९९ लाखाचा दंड, तहसीलदारांची कारवाई!

SCROLL FOR NEXT