सातारा

घाटात घोंगावतोय मृत्यू! जंगलवाडीकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष

यशवंतदत्त बेंद्रे

नुकतीच डोळ्यासमोर वळणावर दरड कोसळल्याने ग्रामस्थांचा थरकाप उडाला. ही घटना कॅमेरात कैदही झाली.

तारळे (सातारा): जंगलवाडी घाटमार्गात गत महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्या तर एका ठिकाणी सीडीवर्क पुलाचा कठडाच तुटून गेला, शिवाय रस्त्याकडेचा भराव वाहिला. दुसऱ्या ठिकाणी डांबरी रस्त्याला घासून भराव तुटला आहे. आधीच या धोक्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यात नुकतीच डोळ्यासमोर वळणावर दरड कोसळल्याने ग्रामस्थांचा थरकाप उडाला. ही घटना कॅमेरात कैदही झाली. यामुळे जंगलवाडी घाटात घोंगावतोय मृत्यू, अशी स्थिती झाल्याच्या बोलक्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. याची दखल जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने घ्यावी, अशी मागणी होत आहे.

तारळे-जंगलवाडी हा सुमारे चार किलोमीटर अंतराचा घाटमार्ग आहे. जंगलवाडी, फडतरवाडी व खडकवाडी या तीन वाड्या डोंगरावर वसल्या आहेत. दीड हजाराच्या सुमारास लोकसंख्या असलेल्या या गावांची दळणवळणाची मोठी बिकट अवस्था होती. स्वातंत्र्यानंतर साडेसहा दशकांनी डांबरी रस्ता मिळाला. मात्र, इतक्या वर्षांनी झालेला रस्ता केवळ देखभाल, दुरुस्तीअभावी धोकादायक झाला आहे. एका बाजूला खोल दरी तर दुसरीकडे डोंगराच्या सातत्याने कोसळणाऱ्या दरडी अशा कात्रीतून नागरिकांना प्रवास करावा लागतोय.

सध्या रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. वळणावर रस्ता खराब झाल्याने अपघातांचा धोका उभा राहिला आहे. दरीच्या बाजूला नसलेले संरक्षक कठडे चालकांची परीक्षा घेत आहे. जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत अनेक ठिकाणी दरडी कोसळून मार्ग बंद झाला होता. प्रशासनाने त्या हटवून मार्ग वाहतुकीला सुरू केला. मात्र, साइडपट्टीवर त्या दरडी अजूनही ठाण मांडून आहेत. हे कमी की काय अजूनही दरडी कोसळत आहेत. नुकतीच एका वळणावर ग्रामस्थांच्या डोळ्यासमोर दरड कोसळल्याने थरकाप उडाला. ही घटना कॅमेऱ्यात कैदही झाली. यामुळे घाटातील धोका वाढत चालला आहे. या धोक्यांची बांधकाम विभागाने पाहणी करून धोके कायमस्वरूपी हटविण्याची एकमुखी मागणी गावांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Inheritance Tax: "निझामाच्या काळातही हे झालं नाही, आता लोकशाही..."; खर्गेंचं 'वारसा कर'च्या आरोपांना उत्तर

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसामुळे आठ ते दहा घरांचे नुकसान

Loksabha election 2024 : ''जेव्हा माझी पंतप्रधान पदासाठी घोषणा झाली तेव्हा मी रायगडावर आलो अन्...'' मोदींनी साताऱ्यात सांगितली आठवण

Revanth Reddy: शहांचा 'तो' व्हिडिओ शेअर करणं भोवलं! तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी दिल्लीला बोलावलं

IPL 2024, KKR vs DC Live Score: ऋषभ पंतने जिंकला टॉस! पृथ्वी शॉ-स्टार्कचं पुनरागमन, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

SCROLL FOR NEXT