crime news sakal
सातारा

कोरेगावात तिघांना पाइप, दगडाने मारहाण; पाच जणांवर गुन्हा

राजेंद्र वाघ - सकाळ वृत्तसेवा

कोरेगाव : दुकानावर लावलेल्या बोर्डावरील नावाच्या कारणावरून शहरातील लक्ष्मीनगर येथील तिघांना पाइपने, दगडाने मारहाण करून धमकी दिल्याप्रकरणी लक्ष्मीनगर येथीलच पाच जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंदर्भात किशोर कांतिलाल ओसवाल (रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की दोन महिन्यांपूर्वी जैन मंदिराशेजारील भांड्याच्या दुकानावर अरिहंत (कासवा) स्टील सेंटर या नावाचा बोर्ड लावला आहे. त्या कारणावरून आमच्या भावकीतील भांड्याचे व्यापारी नितीन छगनलाल ओसवाल (रा. कोरेगाव) यांनी मला ‘तू दुकानाच्या बोर्डवर कासवा नाव का टाकले आहे, ते बोर्डवरून काढून टाक,’ असा निरोप पाठवला व दुकानात येऊन धमकी दिली होती.

दरम्यान, काल (ता. २१) रात्री दहाच्या सुमारास मी व माझा भाऊ आपापल्या दुचाक्यांवरून घरी जाताना आझाद चौकातील मर्दा कॉम्प्लेक्सजवळील कॉर्नरवर पाठीमागून नितीन छगनलाल ओसवाल, राकेश छगनलाल ओसवाल, करन राकेश ओसवाल, ऋषभ नितीन ओसवाल, निल राकेश ओसवाल (सर्व रा. लक्ष्मीनगर, कोरेगाव) व अन्य अनोळखींनी आम्हाला अडवले. या वेळी नितीन ओसवाल याने ‘तू बोर्डवरील नाव का काढले नाही, मी नगरसेवक आहे, तुला दाखवून देईन,’ असे म्हणत त्याचे भाऊ व अन्य लोकांनी मला व माझे भाऊ मनोज, दिनेश यांना स्टीलसारख्या चमकदार पाइपने, रबरी पाइपने व दगडाने मारहाण केली. त्यानंतर मी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येत असताना तहसीलदार कार्यालयासमोरील गेटवर वरील सर्वांनी येऊन मला व माझ्या दोन्ही भावांना शिवीगाळ, दमदाटी केली, तसेच आमची भांडणे सोडवण्यासाठी आलेले चुलते, चुलत भाऊ व इतर लोकांना धक्काबुक्की, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिस नाईक सनी आवटे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS Test: W,W,W... शून्यावर ३ विकेट्स अन् २७ वर ऑलआऊट! ऑस्ट्रेलियासमोर विंडीजची शरणागती, भारताचा लाजीरवाणा विक्रमही मोडला

आनंदाची बातमी! 'गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ५००० बसेस धावणार': मंत्री प्रताप सरनाईक; वाहनदुरुस्ती पथक तैनात करणार

Latest Marathi News Live Updates : 'मी ब्राह्मण आहे; इथे ब्राह्मणांचं जास्त चालत नसलं तरी, उत्तर प्रदेशमध्ये चालतं' - नितीन गडकरी

Ganesh Festival Travel: बाप्पाच्या भेटीसाठी लालपरी सज्ज! कोकणात एसटीच्या ५,००० जादा बसेस धावणार!

Shivsena : 'राजू शेट्टींची प्रकरणे माझ्याकडे, सतेज पाटील बगलबच्च्यांना पुढे करतात'; 'शक्तिपीठ'वरून क्षीरसागरांच्या शिलेदाराची टीका

SCROLL FOR NEXT