Jayakumar Gore
Jayakumar Gore esakal
सातारा

भाजपची सत्ता आल्यास आमदार गोरेंचा नव्या मंत्रिमंडळात होणार समावेश?

फिरोज तांबोळी

भाजप-मित्रपक्षांची सत्ता आल्यास आमदार गोरे यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं बोललं जातं आहे.

गोंदवले (सातारा) : राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळं चर्चेला उधाण आलं असतानाच माणचे आमदार जयकुमार गोरेंनी (Jayakumar Gore) केलेल्या सूचक विधानामुळं लवकरच माणला लाल दिवा मिळणार, अशी चर्चा सुरु आहे. भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता आल्यास आमदार गोरे यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश असेल, असा विश्वासही कार्यकर्त्यांसह जनसामान्यांतून व्यक्त होतोय.

विधानसभेच्या सलग तीन पंचवार्षिक निवडणुकीत निवडून येऊन आमदार जयकुमार गोरेंनी माणमधील भक्कम मानल्या जाणाऱ्या राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर ठेवलं. २००९ मध्ये अपक्ष, २०१४ मध्ये काँग्रेस तर २०१९ च्या निवडणुकीत भाजपमधून (BJP) विजयी होऊन गोरेंनी यशाची हॅट्रिक साधली. माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या आमदार गोरेंची नुकतेच भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड करून राजकीय ताकद देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

सध्या शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे (MLA Eknath Shinde) यांनी स्वपक्षाविरोधातच बंड करून आपला वेगळा गट तयार केला आहे. तब्बल चाळीसहून अधिक आमदार आपल्याकडं असल्याचा दावा करत शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजप बरोबर सत्ता स्थापन करावी, अशी या बंडखोर आमदार गटाची मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर माणचे आमदार व भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरेंनी खासगी वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देऊन सत्तांतराची गणिते जुळून भाजपाचे सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असं सूतोवाच त्यांनी केलंय. भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा विश्वासही गोरेंनी व्यक्त केलाय.

राज्यात भाजप व मित्रपक्षांना सत्ता स्थापन करण्यात यश मिळाले तर माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी वर्णी मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आपल्या आमदारकीच्या काळात माणच्या पाणीप्रश्नासह एमआयडीसी व इतर समस्यांबाबत आमदार गोरेंनी विधानसभेत आवाज उठविला आहे. माण-खटाव मतदार संघातील समस्या सोडविताना आक्रमक भूमिका घेत असल्याने आमदार गोरेंनी राज्यात आपला पगडा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपचा राज्यातील राजकीय शत्रू मनाला जाणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी गोरेंना मंत्रिपद देऊन जिल्ह्यातील ताकद वाढविण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो असाही आखाडा बांधला जात आहे. या पार्श्वभूमीवर माणला लवकरच लाला दिवा मिळणार अशी चर्चा जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळतंय. आमदार गोरे समर्थकांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, त्यांनी पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या भाजप कार्यकर्त्याची हकालपट्टी केल्याचंही समजतंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari : '60 वर्षांत जेवढी विकासकामे झाली नाहीत, तेवढ्या कितीतरी पटीने अधिक विकासकामे आम्ही केली'

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांनी गाठला तळ; फक्त १४ टक्के पाणीसाठा शिल्लक

Loksabha 2024: भाजपने कापली दहा खासदारांची उमेदवारी; वाचा कोणा कोणाचा पत्ता झाला कट

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT