कऱ्हाड : नगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक (Karad Municipal Election) विभागाकडून मतदारयाद्यांसह अन्य कार्यवाही सुरू करण्यात आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकारणात कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतो. त्याचे प्रत्यंतर नुकतेच आले असून, माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या नेत्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या एका युवा नेत्यासोबत मनोमिलन केल्याची चर्चा आहे. त्या दोघांची एका आलिशान हॉटेलमध्ये कमराबंद चर्चा झाली. या दोघांच्या गाठीभेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
पावसाळा संपल्यानंतर स्थायिक स्वराज्य संस्थांचे बिगूल वाजणार आहेत. पालिकांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने दोन सदस्यीय प्रभाग रचना करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार त्याची कार्यवाही नगरविकास विभागाने (Urban Development Department) सुरू केली आहे.
पालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय कामकाज सुरू झाल्याने इच्छुकांनीही वातावरण निर्मिती करण्यास प्रारंभ केला आहे. शहरातील विविध कार्यक्रमांसाठी होणारे नेत्यांच्या दौऱ्यात प्रामुख्याने अनेकजण स्वतःला फोकस करताना दिसून येत आहेत. त्याचबरोबर स्वतः केलेली कामे, सध्या सुरू असलेली कामे दाखवण्यासाठीही त्यांचा खटाटोप सुरू असल्याचे दिसत आहे.
पालिकेची सत्ता आपल्याच गटाच्या ताब्यात यावी, यासाठी सर्वांनीच प्रयत्न सुरू केला असून, आघाडीच्या नेत्यांकडून उमेदवारांची चाचपणी केली असून, नवीन-नवीन लोक आपल्या गटात यावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एकीकडे प्रत्येकाची रणनीती सुरू असतानाचा पालिकेत माजी उपनगराध्यक्ष राहिलेल्या एका नेत्याने शहरातील आपल्या विरोधात असणाऱ्या एका युवा नेत्यालाच जवळ करण्याची रणनीती अवलंबली आहे.
स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा असलेल्या युवा नेत्याची आणि माजी उपनगराध्यक्ष यांची शहरानजीकच्या एका आलिशान हॉटेलमध्ये बैठक झाली. त्यात जुनी उणीदुणी विसरून पुढे एकत्र काम करण्यासंदर्भात चर्चा झाल्याचे समजते. सध्या शहरातील राजकीय वर्तुळात या बैठकीची चर्चा सुरू आहे.
कऱ्हाडात विविध आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. त्याला मागील निवडणूक अपवाद आहे. कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी सख्य असलेली जनशक्ती आघाडी, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी, शिवसेनेचे नेते राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची लोकसेवा आघाडी आदी आघाड्यांच्या माध्यमातून झाल्या आहेत. या आघाड्यांकडूनही आगामी पालिका निवडणुकीसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे कोणकोणत्या आघाडीकडे जाणार, त्याला कितपत यश येणार? हे लवकरच समोर येईल.
पालिकेच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली सुरू आहेत. त्यासाठी दुसऱ्या फळीतील युवा नेत्यांकडून फील्डिंग लावण्यात येत आहेत. पहिल्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अतुल भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर आदी नेते शांत असल्याचे दिसत आहेत. मात्र, दुसऱ्या फळीतील नेत्यांकडून फील्डिंग लावण्यात येत आहे. त्याला कितपत यश येईल, हे सध्या सांगता येत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.