कऱ्हाड पंचायत समिती
कऱ्हाड पंचायत समिती Sakal
सातारा

शिक्षण विभागाला उपसभापतींचा घरचा आहेर; कामकाजावर जोरदार ताशेरे

हेमंत पवार

कऱ्हाड : यशवंतराव चव्हाण शिक्षण मंडळाची स्थापना, शिक्षकांची रिक्त पदे, शालेय परीक्षांचे पेपरच न घेणे, शिक्षक (Teachers) कामावर हजर न राहणे, परस्पर शिक्षकांची नेमणूक करणे, शाळांना (Schools) समायोजन करून शिक्षक न देणे या ना अशा अनेक मुद्द्यांवर पंचायत समितीच्या सभेत आज शिक्षण विभागावर सदस्यांकडून ताशेरे ओढण्यात आले. दरम्यान, उपसभापती रमेश देशमुख यांनीही प्रश्न विचारून पंचायत समितीला घरचा आहेर दिला. सदस्य रमेश चव्हाण यांनी हे प्रश्न आठवड्यात न सुटल्यास सर्व सदस्य उपोषणास बसतील, असा इशाराही दिला. सभापती प्रणव ताटे अध्यक्षस्थानी होते.

शिक्षण विभागाचा आढावा सुरू असताना सदस्य नामदेव पाटील यांनी गोटे येथील शाळेत मागणी करूनही शिक्षक का दिले नाहीत, अशी विचारणा केली. सदस्य बाळासाहेब निकम, पाटील, कारंडे यांनीही शिक्षकांचे प्रश्न उपस्थित केले. त्याचदरम्यान उपसभापती देशमुख यांनी यापूर्वी बैठक घेऊन शिक्षकांचे पंचायत समिती पातळीवर तात्पुरते समायोजन करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळवे, असे सांगितले होते, तरीही का कार्यवाही केली नाही, अशी विचारणा गटशिक्षणाधिकारी मुजावर यांना केली.

त्यावर त्यांनी तो प्रस्ताव मान्यतेला पाठवला असल्याचे सांगितले. त्यावर उपसभापती देशमुख यांनी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्याला कोण जबाबदार, शिक्षक शाळेत जात नाहीत. त्यांना कोण विचारणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेले उत्तर न पटल्याने त्यांनी जोरदार ताशेरे ओढले. त्याचदरम्यान सदस्य अॅड. शरद पोळ यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने शिक्षण मंडळ सुरू करण्यासाठी आम्ही शाळांना सांगितले होते. नऊ महिन्यानंतरही कार्यवाही का झाली नाही. हे यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने असलेल्या सभागृहाला शोभते का? असा प्रश्न उपस्थित केला.

त्यावर गटशिक्षणाधिकारी यांनी त्यासाठीच्या जागेला मान्यता मिळाली नाही, असे सांगितले. त्यावर उपसभापती देशमुख यांनी हे तुम्ही आमची टर्म संपत आल्यावर आता सांगताय का? अशी विचारणा करून पहिल्यांदा ते बीआरसीचे कार्यालय बंद करा, तरच अधिकारी कार्यालयात बसतील आणि सर्व कामे मार्गी लागतील, असे अधिकाऱ्यांना सुनावले. त्यावर सभापती ताटे यांनी ही कामाची पद्धत योग्य नसून आवश्यक ती कार्यवाही मुदतीत का झाली नाही, अशी विचारणा केली.

उपसभापती देशमुख यांनी शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या ठरल्या होत्या. त्याही घेण्यात आल्या नाहीत, असेही सभागृहासमोर छपाई प्रेसवाल्याच्या संभाषणावरून दाखवून दिले. त्यावर गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांनी सर्व खातेप्रमुखांनी पंचायत समितीच्या सभेत जे प्रश्न उपस्थित होतील. त्याची कार्यवाही तातडीने करून त्याची माहिती सदस्य व पदाधिकाऱ्यांना द्यावी, यापुढे कोणीचीही गय केली जाणार नाही, असे सुनावले. या वेळी अन्य विभागांचा आढावा घेण्यात आला.

पाणी योजना लांबल्यामुळे असमाधान

कऱ्हाड तालुक्यात २०१३ पासून पाणी योजनांची कामे अजूनही सुरू आहेत. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर पाणीपुरवठा उपअभियंता सुनील बसुगडे यांनी निधीमुळे कामे लांबली असून, ती पूर्णत्वाकडे आल्याचे सांगितले. दरम्यान, पाणी योजनेचे आराखडे तयार करण्यासाठी पैसे मागितले जात असल्याचाही आरोप उपसभापती देशमुख यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT