karad urban bank sakal
सातारा

सातारा : कराड अर्बन बँकेने नाव अर्थविश्वात कोरले

बाळासाहेब पाटील; बँकेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : कराड अर्बन बँकेने सामाजिक बांधिलकी जपत अर्थविश्वात नाव अधोरेखित केले आहे, असे गौरवोद्गार सहकार तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी काढले. बँकेच्या १०५ व्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, कुटुंबप्रमुख सुभाषराव जोशी, उपाध्यक्ष समीर जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव उपस्थित होते. यावेळी मुख्य कार्यालयात विविध कार्यक्रम पार पडले. अर्बन कुटुंबप्रमुख जोशी व बँकेचे अध्यक्ष डॉ. एरम यांच्या हस्ते सहकारमंत्री पाटील यांचा सत्कार झाला.

यावेळी बँकेच्या सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन सहकारमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. सहकारमंत्री पाटील म्हणाले, ‘‘कराड अर्बन बँकेच्या अद्ययावत सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्रातर्फे सहकारात कमी होत असलेल्या युवकांची संख्या वाढविण्याच्या उद्देशाने प्रबोधनपर उपक्रम राबवावेत. डॉ. द. शि. एरम, सुभाषराव जोशी यांनी भविष्यात येणारे बदल आत्मसात करत व्यावसायिकतेला प्राधान्य दिल्यामुळे बँकेची सर्वांगीण प्रगती तीही गुणात्मकता टिकवून साध्य झाली आहे.’’ कुटुंबप्रमुख जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. बँकेचे अध्यक्ष डॉ. एरम यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरव यांनी सूत्रसंचालन केले. सेवक प्रशिक्षण व संशोधन केंद्राचे प्राचार्य दिलीप देशपांडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resign: राजकीय उलथापालथ! माणिकराव कोकाटेंचा राजीनामा; क्रीडा खात्याची जबाबदारी कुणाकडे?

IND vs SA, T20I: भारत-दक्षिण आफ्रिका संघातील लखनौत होणारा चौथा सामना रद्द; कारण घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : कुंद्रा दाम्पत्यावर फसवणुकीचे कलम

Video: परिस्थितीमुळे क्रिकेट सोडायण्याचा विचार, पण वडिलांची खंबीर साथ; IPL 2026 संधी मिळालेल्या ठाण्याच्या पोराची भावनिक कहाणी

Vasai Virar Election : वसई-विरार महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती जाहीर; जागावाटपावर मात्र संभ्रम कायम!

SCROLL FOR NEXT