krishna river esakal
सातारा

सातारा : ‘कृष्णा’ला जलपर्णीसह प्रदूषणाचा विळखा

‘प्रदूषणमुक्त कृष्णा’ उपक्रमाचा विसर

सकाळ वृत्तसेवा

‘प्रदूषणमुक्त कृष्णा’ उपक्रमाचा विसर

कऱ्हाड : कृष्णा नदीचे(kirshna river) जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पात्र प्रदूषणाच्या विळख्यात अडकले आहे. जिल्ह्यातील तब्बल २० टक्के कृष्णा नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकल्याची भीती पर्यावरण अभ्यासक व्यक्त करताहेत. त्यासह प्रदूषणाचा विळखा धोकादायक ठरत आहे. वाईला नदी संवर्धन समितीचे(River Conservation Committee) कृष्णा स्वच्छतेचे केलेले प्रयत्न वगळल्यास कृष्णा काठावरील कोणत्याच गावात कृष्णा नदी स्वच्छता किंवा प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न केले जात नसल्याचे वास्तव आहे.

स्वच्छतेचा विसर पडल्याने कऱ्हाडला तर ‘कृष्णा’सोबत कोयना नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. ‘कृष्णा’तील जलपर्णी कोयना नदीकडे सरकू लागली आहे. ‘कृष्णा’च्या कमळेश्वर मंदिर परिसर, तर कोयना नदीचाही काही भाग जलपर्णीने व्यापला आहे. पालिकेने स्वच्छता अभियानसह माझी वसुंधरांतर्गत निधीतून जलपर्णीमुक्त करण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसत नाही. तीच अवस्था जिल्ह्यातील धोम, वाई, कण्हेरसह सातारा शहराचीही आहे. जलपर्णीमुक्तीसाठी जिल्ह्यात निधीची तरतूद होताना दिसत नाही. वास्तविक पालिकांनी त्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

कृष्णा नदीत(krishna river) वाढणारी जलपर्णी (Water hyacinth)मोठ्या प्रमाणात पसरत आहे. ती वेळीच काढली नाही, तर ‘कृष्णा’सह अन्य नद्याही जलपर्णीच्या विळखा सापडणार आहेत. जलपर्णीने ‘कृष्णा’च्या पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया लांबण्याचा धोका आहे. जलपर्णीमुळे नदीतील ऑक्सिजन कमी होतो. जलपर्णी हटविली नाही, तर ऑक्सिजन कमी होण्याचाही धोका आहे. कऱ्हाड, सातारा, वाईसह धोम परिसरात जलपर्णी वाढण्याची भीती आहे. जलपर्णी दोन वेलींपासून केवळ १२० दिवसांत एक हजार २०० वेलीपर्यंत वाढते. २७ ते ३० अंश डिग्री सेंटिग्रेड तापमान तिच्या वाढीसाठी आवश्यक असते. १० ते ४० अंश तापमानातही तग धरते. हिवाळा वगळता अन्य ऋतूत बहरणारी जलपर्णी धोक्याची आहे. फुलांच्या भागापासून तयार होणारी फळे पाण्यात बुडालेली असतात. त्याच्या बिया पडून पाण्यात रुजतात. त्यातून नव्या जलपर्णीचा जन्म होतो. आता कऱ्हाडला (karad)वाढणारी जलपर्णी लक्ष न दिल्यास पुढे धोक्याची ठरणार आहे.

जलपर्णीचा तोटा...

  1. नदीच्या पाण्यातील ऑक्सिजन(oxgyen) कमी होतो

  2. नदीच्या पाण्यात जाड मॅट विरघळल्याने धोका वाढतो

  3. जलचर मासे, पक्ष्यांसह अन्य जिवांचेही जीवनचक्र धोक्यात येते

  4. डासांसह रोग पसरवणाऱ्या कीटकांची उत्पत्ती वाढते

  5. रोग पसरवणाऱ्या किटकांची प्रजनन स्थानेही वाढण्यास मदत करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT