Covaxin esakal
सातारा

VIDEO पाहा : साताऱ्यात लसीचा तुटवडा; दुसरा डोस देण्यास विलंब झाल्याने नागरिक त्रस्त

सध्या जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे.

सिध्दार्थ लाटकर

सातारा : Covaxin Vaccine Scarcity In Satara : सध्या जिल्ह्यात लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली चार हजार लस आज (बुधवार) 45 वयोगटापुढील नागरिकांना देण्यात येत आहे. मात्र, अद्याप हा तुटवडा कमीच असल्याने नागरिकांना पुरेसे लसीकरण होताना दिसत नाही, त्यामुळे नागरिकांतून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. (Lack Of Covaxin Vaccine In Satara District)

दरम्यान, Covaxin लसीचा तुटवडा असल्याने आज कस्तुरबा रुग्णालयाच्या बाहेरील नागरिकांना पोलिसांनी covishield आहे, covaxin नाहीये असे सांगून ज्यांना covaxin लस हवी होती त्यांना घरी पाठविले. याबरोबरच सिव्हिल हाॅस्पिटल येथे ज्येष्ठ नागरिकांना बसण्यास खुर्ची नसल्याने काहींनी संताप व्यक्त केला. काही महिलांनी रांगेत न उभे राहणा-यांना लस दिली जात असल्याचा आरोप केला. लसीकरणाचा तुटवडा असल्याने पहिला डोस दिलेल्या नागरिकांना दुसरा डोस देण्यास विलंब लागत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत 18 ते 44 वयोगटासाठी जिल्ह्यात उपलब्ध असलेली चार हजार लस आज (बुधवार) 45 वयोगटापुढील नागरिकांना देण्यात येत होती. ही वर्ग केलेली लस जिल्ह्यातील 11 सेंटरमध्ये उपलब्ध आहे.

देशभरात 45 वर्षांपुढील नागरिकांच्या लसीकरणास एक एप्रिलपासून सुरुवात झाली. यामध्ये सातारा जिल्ह्यात 9 लाखांहून अधिक नागरिकांची नोंदणी झाली होती. यातील 50 टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले, तसेच बहुतांशी नागरिकांचा पहिला डोस झाला होता. मात्र, जिल्ह्याला लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अनेकांच्या दुसरा डोसला विलंब लागत होता.

दरम्यान, राज्यभरात 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाली. या वयोगटाची जिल्ह्यात सुमारे 11 लाख लोकसंख्या असून, त्यांच्या लसीकरणासाठी केवळ ऑनलाइन बुकिंग बंधनकारक करण्यात आले होते, तर दररोज 200 लशींचा कोटा उपलब्ध होता. त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध होणारी बहुतांशी लस 18 ते 44 वयोगटासाठी दिली जात होती. 45 वर्षांपुढील नागरिक केवळ लशीच्या प्रतीक्षेतच राहात होते. दरम्यान, राज्य सरकारने 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण तूर्तास थांबवून ही लस वयोवृद्ध नागरिकांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे 45 वर्षांपुढील बहुतांश नागरिकांना दुसरा डोस मिळणे सोईस्कर झाले आहे.

जिल्ह्यातील 11 केंद्रांवर लसीकरण

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी उपलब्ध झालेली चार हजार लस 45 वयोगटातील नागरिकांना मिळणार आहे. ही वर्ग केलेली लस जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड, उपजिल्हा रुग्णालय फलटण, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र खटाव, ग्रामीण रुग्णालय पाटण, ग्रामीण रुग्णालय महाबळेश्‍वर, ग्रामीण रुग्णालय दहिवडी, ग्रामीण रुग्णालय मेढा, ग्रामीण रुग्णालय वाई, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ या ठिकाणी उपलब्ध असणार आहे.

Lack Of Covaxin Vaccine In Satara District

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT