Vaduj bazar samiti Election esakal
सातारा

Bazar Samiti Result : लग्नाच्या वाढदिनीच घडला 'असा' योगायोग अन् चक्क पतीनं केलं पत्नीचं औक्षण

बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव विकास आघाडीच्या महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार लता आनंदा जगदाळे या विजयी झाल्या.

आयाज मुल्ला

लग्नाच्या वाढदिवशीच विजयश्रीचा हा अनोखा योगायोग जुळून आला. त्यामुळं जगदाळे कुटुंबीयांच्या आनंदात दुग्धशर्करा योग निर्माण झाला.

वडूज (सातारा) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव विकास आघाडीच्या महिला राखीव मतदारसंघातील उमेदवार लता आनंदा जगदाळे या विजयी झाल्या. त्यामुळं त्यांचे पती आनंदा जगदाळे यांनी स्वतः औक्षण करून आपल्या पत्नीचं कौतुक केलं.

विशेषत: जगदाळे दांपत्याच्या लग्नाच्या विसाव्या वाढदिवशीच त्यांना बाजार समिती निवडणुकीतील विजयश्री मिळाली. जगदाळे यांच्या औक्षणाची व लग्नाच्या वाढदिवसाच्या या दुग्धशर्करा योगायोगाची नागरिकांत चर्चा होत आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडी व राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटना पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनेल यांच्यात दुरंगी व चुरशीची लढत झाली. निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीनं १८ पैकी १३ जागा जिंकत बाजार समितीवरील सत्ता कायम ठेवली. निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीतून महिला उमेदवार सौ. जगदाळे व सुनीता मगर या विक्रमी मतांनी निवडून आल्या. जगदाळे यांचे माहेर वेळू (ता. कोरेगाव) तर सासर पेडगाव (ता.खटाव) आहे.

बाजार समिती निवडणुकीत सौ. जगदाळे या विजयी झाल्या. शिवाय, लग्नाच्या वाढदिवशीच विजयश्रीचा हा अनोखा योगायोग जुळून आला. त्यामुळं जगदाळे कुटुंबीयांच्या आनंदात दुग्धशर्करा योग निर्माण झाला. एका कर्तबगार महिलेनं विजय संपादन केल्याबद्दल त्यांचाही गुणगौरव व्हावा. या भावनेतून पती आनंदा जगदाळे यांनी पत्नी जगदाळे यांचे पारंपारिक पद्धतीनं औक्षण केलं. यावेळी सासू श्रीमती सरूबाई जगदाळे, विद्या कोळी, कल्पना जाधव, सारिका घार्गे, संगीता दबडे आदी महिला उपस्थित होत्या. सध्या सहकार क्षेत्रामध्येही महिलांची कर्तबगारी दिसून येत आहे. त्यामुळे वरिष्ठांनी बाजार समितीच्या अध्यक्षपदाची सौ. जगदाळे यांना संधी द्यावी, अशी मागणी सोसायटी व ग्रामपंचायत, तसेच महिला वर्गातून होत आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीत खटाव तालुका विकास आघाडीतून पत्नी लता यांना वरिष्ठांनी उमेदवारीची संधी दिली. मतदारांनीही त्यांना चांगले मताधिक्क्य देऊन विजयी केले. त्याबद्दल सर्वांचे आभार. पत्नी लता यांनी या निवडणुकीच्या निमित्ताने स्वत:मधील गुणवत्ता सिध्द केल्याने त्यांच्या कर्तुत्वाचे विजयी औक्षण करताना आनंद होत आहे. आमच्या लग्नाच्या वाढदिवशीच ही विजयाची मिळालेली अनोखी भेट आयुष्यभर कायम लक्षात राहील, असं आनंदा जगदाळे यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT