Udayanraje Bhosale esakal
सातारा

'काय बाय सांगू, कसं गं सांगू म्हणण्याची वेळ तुमच्‍यावर आली नसती'

गिरीश चव्हाण

सत्तेचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन नारळ फोडण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी लावलाय.

सातारा : सत्तेच्‍या बळावर नगरपालिकेला (Satara Municipality) गैरव्यवहाराचे कुरण बनवत पैसे खाण्‍याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी सुरू ठेवला होता. आता काही दिवसच बाकी असल्‍याने आम्‍ही साताऱ्यासाठी काही तरी करत आहोत, असा दिखावा करत सातारा विकास आघाडीने सहानुभूती मिळवण्याचा खटाटोप सुरू केल्‍याची टीका विरोधी पक्षनेते अशोक मोने (Ashok Mone) यांनी पत्रकाव्‍दारे केली आहे.

जनाधार तुटल्‍याने प्रशासकीय मान्यता व निधी नसताना नूतन प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा घाट घातल्‍याची टीका करत श्री. मोने यांनी कितीही दिखावा केला तरी सत्ता बदल होणारच, असा विश्‍‍वासही पत्रकात व्‍यक्‍त केला आहे. या पत्रकात म्‍हटले आहे की, गेल्या साडेचार वर्षांत पालिकेतील भ्रष्ट कारभाराने कळस गाठला असून निवडणूक जवळ आल्याने सत्तेचा स्वार्थ डोळ्यासमोर ठेऊन साताऱ्यात नारळ फोडण्याचा सपाटा सत्ताधाऱ्यांनी लावला आहे.

पालिकेच्या ज्या नूतन इमारतीचे भूमिपूजन थाटात करून आम्ही किती काम करतोय, हे सत्ताधारी सांगत आहेत, त्या प्रशासकीय इमारतीला अद्याप कोणतीही तांत्रिक मान्यता मिळालेली नाही. सत्ता मिळाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी फक्‍त लूटच केली असून काही दिवस उरल्याने आम्ही कसा विकास करतोय, हे दाखवण्याचा ते केविलवाणा प्रयत्न स्वप्नपूर्तीच्‍या नावाखाली सुरू असल्‍याची टीका करत नगराध्‍यक्षा माधवी कदम (Mayor Madhavi Kadam) यांच्‍या अनुपस्‍थितीबाबत श्री. मोने यांनी पत्रकाव्‍दारे प्रश्‍‍न उपस्‍थित केले आहेत.

...'कसं गं सांगू’ म्‍हणायची वेळ आली नसती

गेल्या साडेचार वर्षांत सातारा विकास आघाडीने खाबूगिरीऐवजी विकासकामे केली असती तर आज ‘काय बाय सांगू, कसं गं सांगू’ म्हणण्याची वेळ तुमच्‍यावर आली नसती. तुमची कामे आणि तुमचा विकास काय आहे, हे सातारकरांना कळून चुकले आहे. त्यामुळे कितीही नारळ फोडा आणि कितीही भूलथापा मारा, निवडणुकीत सत्तापालट करून सातारकर तुम्हाला धडा शिकवतील, असा इशारा श्री. मोने यांनी पत्रकात दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स देते, मराठी बोलणार नाही; पुण्यात परप्रांतीय महिलेचा कॅबचालकाशी वाद, व्हिडिओ व्हायरल

Gurupournima 2025: गुरुपौर्णिमा 10 की 11 जुलैला? जाणून घ्या तिथी, पूजा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

'या' कारणामुळे रणवीर सिंहला शाळेतून केलेलं निलंबित, बटर चिकन विकणाऱ्या अभिनेत्याला कशी मिळाली दीपिका?

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: आषाढी एकादशी स्पेशल पौष्टिक अन् चविष्ट खास २ उपवासाच्या रेसिपीज; नक्की ट्राय करा

Latest Maharashtra News Live Updates: नाशिकच्या सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनास बंदी

SCROLL FOR NEXT