Rain Update Mahabaleshwar  esakal
सातारा

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर महाबळेश्वरमध्‍ये सर्वाधिक 104 मिलिमीटर पाऊस; कोयनेतून 1 हजार 50 क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग

महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यात सर्वाधिक १०४ मिलिमीटर पाऊस झाल्‍याची नोंद जिल्‍हा प्रशासनाकडे झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

महाबळेश्‍‍वर, नवजा या भागात पावसाचा जोर कायम असून, कोयना धरणात (Koyna Dam) येणाऱ्या पाण्‍याच्‍या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

सातारा : गेल्या चोवीस तासांत महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यात सर्वाधिक १०४ मिलिमीटर पाऊस झाल्‍याची नोंद जिल्‍हा प्रशासनाकडे झाली आहे.

महाबळेश्‍‍वरबरोबरच सातारा तालुक्‍यात २३.५ मिलिमीटर, जावळीत ४४.०, पाटणमध्‍ये ६६.३, कऱ्हाड- २०.२, कोरेगाव- ८.६, खटाव- ६.९, माण- ६.१, फलटण- १.२, खंडाळा- ६.२, वाई-१९.३ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्‍यम प्रकल्‍पांतर्गत येणाऱ्या धरणांमध्ये एकूण ७२.१९ अब्ज घनफूट पाणीसाठा असून, धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ४८.४९ टक्के इतका असल्याची माहिती कृष्‍णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्‍या कार्यालयाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.

महाबळेश्‍‍वर, नवजा या भागात पावसाचा जोर कायम असून, कोयना धरणात (Koyna Dam) येणाऱ्या पाण्‍याच्‍या आवकेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाण्‍याची आवक विचारात घेत धरण व्‍यवस्‍थापनाने सोमवारी दुपारी चारनंतर पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्‍युसेक इतक्‍या पाण्‍याचा विसर्ग सुरू केला. विसर्गाच्‍या पार्श्वभूमीवर नदीकाठावरील गावांत सतर्कतेच्‍या सूचना करण्‍यात आल्‍या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT