उदयनराजे sakal
सातारा

मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

मी लोळत जाईन, नाहीतर गडगडत जाईन. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल, तर तुम्हीही असे करा.

सकाळ वृत्तसेवा

सातारा : जनतेला कामे पाहिजेत, कामे करायची नाहीत आणि ते याच्यावरून गेले, त्याच्यावरून गेले, अशी टीका करायची. मी दुचाकीवरून जाईन, मी लोळत जाईन, नाहीतर गडगडत जाईन. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल, तर तुम्हीही असे करा. ही लोकशाही आहे, असे प्रतिउत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंना दिले आहे. दरम्यान, हिंमत असेल तर समोरासमोर या, असे आव्हान त्यांनी दिले.

विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर भवानीमातेच्या दर्शनासाठी खासदार उदयनराजे भोसले आज प्रतापगडावर गेले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मला चारचाकी परवडत नाही, म्हणून मी दुचाकीवरून फिरतो. मी कसे फिरावे हे मी ठरवेन. मी चालत फिरेन, रांगत फिरेन. कारण माझे गुडघे दुखतात.

काही राज्यांत सुटका झाली, की लोक लोटांगण घालत मंदिराला प्रदक्षिणा मारतात. त्यानुसार मी लोळत जाईन नाही, तर गडगडत जाईन. याबद्दल कोणाला दुःख वाटत असेल तर त्यांनीही असे करावे. कारण लोकशाही आहे.’’

ईडी आल्यास पुराव्यानिशी यादी देईन

प्रत्येकाने आपापले झाकायचे, असे हे सोयीचे राजकारण सध्या चालले आहे. आपण जे पेरतो तसं उगवतं. माझ्या मागे का ईडी येत नाही, असा प्रश्न उपस्थित करून हिंमत असेल तर ईडीने माझ्याकडे यावे. त्यांना मी सर्वांची पुराव्यासह यादी देतो. कोणी कुठल्याही पक्षातील असू देत. माझ्याकडे सगळ्यांची माहिती आहे, असा गौप्यस्फोट खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतापगडावरून केला आहे.

खासदारसाहेबांना एकीकडे पेट्रोल परवडत नाही म्हणतात आणि एक कोटीची नवीन बीएमडब्ल्यू घेतात. ती कशावर चालविणार, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी चालत जायचं, की लोळत हे त्यांचे त्यांनी ठरवावे; पण सातारा पालिकेला लोळवू नका.

- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युनायटेड किंगडममध्ये फूट पडणार? स्कॉटलंड, वेल्स अन् नॉर्दर्न आयर्लंडचे नेते करणार मोठी घोषणा?

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

SCROLL FOR NEXT