चर खणल्याने मनस्ताप esakal
सातारा

चर खणल्याने मनस्ताप! केळघर बाजारपेठेत 20 दिवसांपासून स्थिती

दुकानदारांसह नागरिकांची प्रचंड गैरसोय

संदीप गाडवे

हे काम संथगतीने सुरू असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

केळघर (सातारा): गेल्या १५ ते २० दिवसांपासून केळघर बाजारपेठेतील रस्त्यालगत गटार व नाल्यासाठी मोठमोठे चर खणून ठेवल्यामुळे दुकानदार, ग्राहक, घरमालक, शेतकरी यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

विटा-महाबळेश्वर रस्त्याचे चारपदरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. केळघर परिसरात रस्ता रुंदीकरणाचे काम कुर्मगतीने सुरू आहे. गेल्या १५ ते २० दिवस झाले मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या गावाकडील बाजूलगत सुमारे पाच ते सहा फूट चर खणले आहेत. त्यातच दररोज संध्याकाळी जोरदार पाऊस पडत आहे. परिणामी संपूर्ण गावाचे व रस्त्यावरील पाणी या चरींमध्ये साचून तलावाचे स्वरूप प्राप्त होत आहे. त्यामुळे घरांत, दुकानांत, दवाखान्यांत जाणे मुश्किल झाले असून, दुर्दैवाने एखादा अपघात होण्याची शक्यता आहे. अत्यवस्थ रुग्णांना रस्ता नसल्याने उपचारासाठी नेणेही अवघड झाले आहे.

ठेकेदाराने नाल्याचे काम कुठल्यातरी एका बाजूने सलग करावयास हवे होते. परंतु, तसे न करता जागोजागी चर खणल्याने व शुक्रवारी गावात जाणारा मुख्य रस्ताही बंद झाला असल्यामुळे रस्त्याखालील बाजूस राहणाऱ्या शेतकऱ्यांची जनावरे घरात बांधून ठेवण्याची वेळ आली आहे. तर ऐन सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठेतील दुकानांत ग्राहक नसल्याने दुकानदारांनी संताप व्यक्त केला आहे. वास्तविक नाल्याचे काम टप्प्याटप्प्याने करावयास हवे होते. परंतु, ठेकेदाराच्या नियोजनशून्य व मनमानी कारभारामुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. येत्या दोन दिवसांत नाल्याचे काम पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NTA Exam Calendar 2026-27 Out : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! जेईई मेन, यूजीसी-नेटसह प्रमुख परीक्षांच्या तारखा जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Tata Sons Reappointment : RBI च्या निर्देशानंतर टाटा समूहात मोठा उलटफेर! नोएल टाटांचा विरोध डावलून एन. चंद्रशेखरन यांची अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

Shivsena Case : शिंदे गटाला पक्ष, धनुष्यबाण चिन्ह देताना कोणते निकष? सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला थेट सवाल, सुनावणीत नेमकं काय घडलं?

'कौलारू माडी गं, हिरव्या बागा कोकणा...' गाण्यावर वर्षा उसगावकर, किशोरी शहाणे यांचा जबरदस्त डान्स; व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणतात-

Latest Marathi News Update : 'निवडणूक आयोगाला आपली घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यापासून अनिश्चित काळासाठी रोखले जाऊ शकत नाही'

SCROLL FOR NEXT