Maratha Reservation case esakal
सातारा

Maratha Reservation : पूर्वजांच्या नोंदीची माहिती आता जलद मिळणार; कराडात मराठ्याचं राज्यातलं पहिलं जनसंपर्क कार्यालय सुरु

कऱ्हाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या (Kunbi Certificate) नोंदी सापडत आहेत.

हेमंत पवार

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी दाखले देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला केली होती.

कऱ्हाड : तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कुणबीच्या (Kunbi Certificate) नोंदी सापडत आहेत. मात्र, त्याची गावनिहाय नावे समजत नाहीत. त्यामुळे समाजात संभ्रमावस्था झाली आहे. ती दूर करण्यासाठी मराठा समाजाच्या वतीने (Maratha Reservation) येथील कऱ्हाड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस कार्यालय सुरू करण्यात आहे. त्याद्वारे कुणबी दाखले काढण्यासंदर्भातीलही अडचणी दूर करण्यात येणार आहेत.

आतापर्यंत ११ हजार ९७९ दाखले सापडले असून, त्यातील चार हजार २३४ दाखले मराठीतील असून, सात हजार ७४५ दाखले मोडी लिपीत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून कुणबी दाखले देण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य शासनाला केली होती. त्याचबरोबर जरांगे-पाटील यांनी सरकारला या प्रश्नी जाग आणण्यासाठी गावोगावी साखळी उपोषण सुरू करण्याचे आवाहन केले होते.

त्याला साथ देत मराठा समाजाकडून कऱ्हाड शहरासह अनेक गावांत साखळी उपोषण सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर प्रशासनाकडून कुणबी दाखले शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सापडलेल्या दाखल्यांची माहिती देण्यात येत नसल्याची तक्रार मराठा समाजाच्या वतीने काल प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार यांच्याकडे करण्यात आली होती.

त्याची दखल घेऊन तातडीने प्रांताधिकारी म्हेत्रे व तहसीलदार पवार यांच्याकडून ती माहिती मराठा समन्वयकांना देण्यात आली आहे. सापडलेल्या दाखल्यांची माहिती मराठा समाजापर्यंत, संबंधित गावापर्यंत पोचावी, यासाठी मराठा समाजाच्या वतीने आज येथील कऱ्हाड अर्बन बॅंकेच्या तळभाग शाखेच्या खालील बाजूस कार्यालय सुरू करण्यात आहे.

मोडी वाचता येणाऱ्यांसाठी संधी

कऱ्हाड तालुक्यात ११ हजार ९७९ दाखले सापडले असून, त्यातील चार हजार २३४ दाखले मराठीतील असून, सात हजार ७४५ दाखले मोडी लिपीत आहेत. मोडी लिपी वाचता येणारा एकच व्यक्ती असून, त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यामुळे मोडी लिपी कोणास वाचता येत असेल, तर प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी संबंधितांनी पुढे यावे, असे आवाहन मराठा समाजाने केले आहे. संबंधितांनी आवश्यक तो मोबदलाही देण्याची तयारी मराठा समाजाने केली आहे.

कार्यालयात होईल हे कामकाज

मराठा समाज बांधवांना कुणबी दाखले काढताना अथवा आपल्या पूर्वजांचे नाव कुणबी म्हणून नोंद आहे का? याची माहिती मिळवण्यासाठी प्रशासनाकडे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे मराठा समाज बांधवांना होणारा त्रास कमी करणे, ज्या मराठा बांधवांचे पूर्वज कुणबी म्हणून नोंदवले गेले आहेत, अशा मराठा बांधवांना कुणबी दाखले काढताना होणारा त्रास दूर करणे हे काम या कार्यालयातून केले जाईल. कुणबी दाखल्यासंदर्भात मराठा समाज बांधवांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Traffic: मुंबईकरांनो आनंदाची बातमी! जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड सुस्साट होणार, मार्गावरील मोठा अडथळा पालिकेने दूर केला

IND vs AUS 1st T20I: ओव्हर्स कमी होण्यामागे पाऊस नव्हे, तर भलतंच कारण! तुम्हाला कळलं तर म्हणाल, आमच्या इथे असं कधी होत नाही...

November Horoscope Marathi : नोव्हेंबरमध्ये 'या' 3 राशींच्या लोकांना त्रासयोग; यात तुमची रास तर नाही ना? पाहा अन् करा सोपा उपाय

थिएटरमध्ये थंड प्रतिसाद पण ॲमेझॉन प्राईमवर Trend होतोय उमेश-प्रियाचा सिनेमा ! टीमने व्यक्त केला आनंद

Ravina Gaikwad : उत्कृष्ट कामगिरी! शेतमजुराच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डंका; वणीच्या रवीना गायकवाडने पटकावले १० हजार मीटरमध्ये रौप्यपदक

SCROLL FOR NEXT