Mayor Rohini Shinde esakal
सातारा

बैलबाजारचा रस्ता राजकीय खोड्याने रखडला : नगराध्यक्षा शिंदे

मार्केट यार्ड गेट क्रमांक एकपासून जाणाऱ्या रस्त्याची पाहणी

सचिन शिंदे - सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड गेट क्रमांक एक ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत महिन्यात दोन वेळा फ्लेक्स झळकले होते.

कऱ्हाड (सातारा) : महिनाभरापासून फ्लेक्सबाजीने गाजणाऱ्या येथील मार्केट यार्ड (Market Yard) ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाला २०१९ मध्येच मंजुरी दिली आहे. मात्र, काही राजकीय व्यक्तींनी खो घातल्याने काम रखडले आहे. ते काम आता त्वरित सुरू करण्याच्या सूचना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे (Mayor Rohini Shinde) यांना दिल्या.

नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत रस्त्याची प्रत्यक्ष जावून पाहणी केली. तेथील नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत पालिकेचे नगरअभियंता एम. एच. पाटील, अभियंता धायगुडे यांच्यासह सामजिक कार्यकर्ते इंद्रजित भोपते, नीलेश वास्के, गणेश पवार, मस्तान आतार, विशाल देशमुख, विशाल भोसले, अभिजित भोपते उपस्थित होते.

मार्केट यार्ड गेट क्रमांक एक ते बैलबाजाराकडे जाणाऱ्या रस्त्याबाबत महिन्यात दोन वेळा फ्लेक्स झळकले होते. सुरवातीला रस्ता दुरुस्तीसाठी हिंदीतून स्लोगन लिहून फ्लेक्स झळकले होते. महिनाभरात काम पूर्ण करण्याचे आश्वासन पूर्ण न झाल्याने क्या हुआ तेरा वादा... अशा आशयाचे फ्लेक्स काल झळकावून रस्त्याच्या कामाचे वाभाडे काढले होते. त्याच रस्त्याची नगराध्यक्षा शिंदे यांनी अधिकाऱ्यांसमवेत जावून पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! झेडपी, मनपा, नगरपालिकांच्या शाळांमध्ये नेमले जाणार अंशकालीन निदेशक; दरमहा १८ हजार मानधन; शाळा व्यवस्थापन समितीला अधिकार; पटसंख्येची अट अशी...

Weekend Special Recipe: नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं हवंय? ट्राय करा पनीर बेसन चिला; चव अशी की एकदा खाल्ल्यावर रोज बनवाल

WPL 2026 Prize Money: विजेत्या RCB ला अन् उपविजेत्या दिल्लीला किती कोटींचं बक्षीस? पुरस्कार विजेत्या खेळाडूही मालामाल

ढिंग टांग : पुणे-मुंबई: एक थरारयात्रा..!

अग्रलेख : द्रुतगती छळमार्ग!

SCROLL FOR NEXT