Minister Ashok Chavan
Minister Ashok Chavan esakal
सातारा

फलटण-म्हासुर्णे रस्त्याची 'Limca Book'मध्ये नोंद; बांधकाम मंत्र्यांकडून विशेष कौतुक

बाळकृष्ण मधाळे

सातारा : सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 वर सलग 24 तास काम करून तब्बल 39.69 किलोमीटर लांबीच्या एक लेन रस्त्याचे बिटुमिनस काँक्रिटीकरणाचे काम केले आहे. सलग 24 तास काम करून एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा विक्रम करून सार्वजनिक बांधकाम विभागातील प्रकल्पाचे (Department of Public Construction Works) काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढविला आहे, अशा शब्दांत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले. (Minister Ashok Chavan Appreciated The Record Road From Phaltan To Mhasurne In Satara District)

सध्या सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सातारा विभागामार्फत सध्या सातारा जिल्ह्यात राज्य मार्ग क्र. 147 फलटण ते म्हासुर्णे या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. काल रविवारी ३० मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत सलग २४ तास काम करून तब्बल ३९.६९ किलोमीटर लांबीच्या एका लेनचे बिटुमिनस काँक्रिट रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. २४ तासांत सुमारे ४० किलोमीटरचा एका बाजूचा रस्ता पूर्ण करण्याचा हा एक विक्रम आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या या कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही (Limca Book of Records) नोंद घेतली आहे.

विभागाच्या या कामगिरीबद्दल मंत्री चव्हाण म्हणाले, कोरोनाच्या (Coronavirus) या काळात अनेक अडचणी असताना बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि या प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे अभियंते, कर्मचारी व कामगारांनी केलेली ही कामगिरी नक्कीच आनंददायी, प्रेरणादायी आहे. त्यासाठी मी संपूर्ण यंत्रणेचे मनापासून अभिनंदन करतो. आपण सर्वांनी महाराष्ट्राचा, देशाचा मान वाढवला आहे. पण, आज एक नवीन विक्रम झाला म्हणून आम्ही इथेच थांबणार नाही. विक्रम रचणे ही एक अभिमानास्पद बाब आहे. मात्र, आपलाच विक्रम मोडून नवीन विक्रम प्रस्थापित करणे, ही अधिक अभिमानास्पद बाब असते. त्यामुळे पुढील काळात आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक उपकरणे वापरून आणखी नवे उच्चांक नोंदवण्याची, तसेच दर्जेदार व उत्तमोत्तम काम करण्याचे आमचे धोरण आहे. त्या दृष्टीने कामे करण्याचे निर्देश मी विभागाला दिलेले आहेत, असेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले.

Minister Ashok Chavan Appreciated The Record Road From Phaltan To Mhasurne In Satara District

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ब्रिटिश साम्राज्याच्या लोकशाहीतील पाऊलखुणा

राजकीय पक्षांच्या नजरेतून स्त्रियांचे प्रश्‍न

आयुर्वेदिक पंचकर्म

हसताय ना, हसलंच पाहिजे!

रक्तातील साखरेचे ‘हिस्टरी बुक’

SCROLL FOR NEXT