Jayant Patil Sharad Pawar esakal
सातारा

जलसंपदा मंत्र्यांचा 'दुष्काळी भागा'साठी मोठा निर्णय; शरद पवारांनीही पाळला 'शब्द'

रुपेश कदम

सांगलीच्या नेत्यांनी दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करुन मिळवलं; पण..

दहिवडी (सातारा) : जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी माण-खटावच्या दुष्काळी भागासाठी महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) माध्यमातून मोठा निर्णय घेतलाय. टेंभू लाभक्षेत्रालगतच्या माण-खटावमधील ४८ गावांमधील १३,१२६ हेक्टर क्षेत्रासाठी २.५० टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आलं आहे. तसेच खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी माण-खटावमधील (Maan-Khatav) जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पाळला असून प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश आलंय.

सांगलीच्या नेत्यांनी सांगलीतील दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करुन मिळवले. मात्र, अनेक वर्षे माण-खटावला टेंभूचे पाणी मिळत नव्हते. प्रभाकर देशमुख हे गेली चार वर्षे शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने टेंभूच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत होते. प्रभाकर देशमुख यांनी दुष्काळी भागाला पाण्याचं आरक्षण देण्याची, तसेच बंद पाईपलाईन मधून पाणी देण्याची योजना शासनाला सादर केली. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रस्ताव तयार करण्यासाठी टेंभूचे मुख्य अभियंता श्री. गुणाणे यांनी सविस्तर सर्वेक्षण केले. मात्र, पाण्याचे आरक्षण मिळत नव्हते.

प्रभाकर देशमुख यांनी जलसंपदा अधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेवून शरद पवार, तसेच जयंत पाटील यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. या योजनेसाठी त्यांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) माण-खटावच्या दौर्‍यावर आले असताना त्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून जयंत पाटील यांनी माण-खटावच्या दुष्काळी जनतेला दिलासा दिला आहे. सातारा व सांगलीतील दुष्काळी तालुक्यांसाठी एकूण आठ टीएमसी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी दीड टीएमसी पाणी खटावसाठी तर एक टीएमसी पाणी माणसाठी आरक्षित करण्यात आले आहे. घाणंद येथून तिसऱ्या टप्प्यात हे पाणी उचलले जाणार असून बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी दिले जाणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडी सरकारचे माण-खटावची दुष्काळी जनता आभार मानत आहे.

प्रशासकीय अनुभव लावला पणाला

"विरळी येथे मागील महिन्यात झालेल्या जाहीर सभेत विरळी भागात टेंभूचे पाणी आम्हीच आणणार असे वचन दिले होते. यानिमित्ताने त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे. यासाठी मी माझा प्रशासकीय अनुभव पणाला लावला. यात मला अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. या निर्णयाबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचा आभारी आहे."

-प्रभाकर देशमुख, माण-खटाव राष्ट्रवादीचे नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT