MLA Prithviraj Chavan
MLA Prithviraj Chavan esakal
सातारा

'भविष्यात कितीही मोठी लाट आली, तरी आरोग्य यंत्रणा कोलमडणार नाही'

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : शासनामार्फत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाजंबो कोविड सेंटर (Covid Center) म्हणून मंजुरी मिळाली आहे. १५ ऑगस्टपासून ते सुरू होऊन तेथे सर्वांवर मोफत उपचार होतील. भविष्यात कितीही मोठी लाट आली, तरी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडणार नाही, अशी माहिती माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (MLA Prithviraj Chavan) यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Undale Regional Water Supply Scheme) नव्याने सुरू होणार असून, त्याची सव्वासहा कोटींची निविदा निघाली असल्याचेही त्यांनी सांगितले. (MLA Prithviraj Chavan Informed That There Will Be A Big Covid Center At Karad bam92)

शासनामार्फत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाजंबो कोविड सेंटर म्हणून मंजुरी मिळाली आहे.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण उपस्थित होते. आमदार चव्हाण म्हणाले, ‘‘कऱ्हाडला १०० खाटांचे शासनामार्फत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलमध्ये तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महाजंबो कोविड सेंटर १५ ऑगस्टपासून सुरू होऊन तेथे सर्वांवर मोफत उपचार होतील. भविष्यात कितीही मोठी लाट आली, तरी आरोग्य यंत्रणा कोलमडून पडणार नाही. उंडाळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांनी सुरू केली. मात्र, त्यानंतर सर्वच योजना बंद झाल्या. ती योजना पुन्हा नव्याने सुरू होणार असून, सव्वासहा कोटींची निविदा निघाली आहे.

त्याद्वारे कोयना वसाहत, जखीणवाडी, नांदलापूर, दुसऱ्या टप्प्यात काले, नारायणवाडी, आटके, आटके-जाधवमळा, वाठार, पवारवाडी, धोंडेवाडी, ओंड, ओंडोशी, सवादे, पाचुपतेवाडी, तिसऱ्या टप्प्यात लटकेवाडी, साळशिंरबे उंडाळे, मनू, कालवडे, जिंती, आकाईचीवाडी या गावांना पाणी देण्याची व्यवस्था होणार आहे.’’ ते म्हणाले,‘‘शासनाने आमदार निधीतील एक कोटीचा निधी कोविडसाठी राखून ठेवला आहे. कऱ्हाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (Karad Primary Health Center), उंडाळे ग्रामीण रुग्णालय (Undale Rural Hospital), शहरातील नागरी सुविधा केंद्र, उपजिल्हा रुग्णालयांनी गरजेच्या वस्तूंची यादी दिली आहे. त्यातून ईसीजी मशिन, ऑक्सिजन मशिनसह अन्य वस्तूंची एकत्रित यादी करून एक कोटीचे साहित्य देण्यात येणार आहे.’’

पालिकेसंदर्भात योग्यवेळी भूमिका

सर्व पालिकांच्या निवडणुका कोविडमुळे सहा महिने पुढे गेल्या आहेत, अशी माझी माहिती आहे. त्याचबरोबर ओबीसी राजकीय आरक्षणाचाही निवडणुकीपूर्वी प्रश्न सुटला पाहिजे. त्यामुळे निवडणुका कधी होतील हे सांगता येत नाही. मात्र, कऱ्हाड पालिका निवडणुकीसंदर्भात योग्य वेळी भूमिका जाहीर करू, असेही आमदार चव्हाण यांनी स्पष्ट केले.

MLA Prithviraj Chavan Informed That There Will Be A Big Covid Center At Karad bam92

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT