Koyna Dam esakal
सातारा

Monsoon Update : कोयना धरणक्षेत्रात दमदार पाऊस; महाबळेश्‍वरात 94 मिलिमीटर पावसाची नोंद

कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.

सकाळ डिजिटल टीम

पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीअगोदर मशागतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, तालुक्याच्या पूर्व भागात कमी झाला आहे. पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस असला तरी पूर्वेकडे तो कमी होत गेलेला आहे.

पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीअगोदर मशागतीची कामे करण्यात शेतकरी व्यस्त आहे. पूर्व भागात कधी उघडीप तर कधी दमदार पावसाच्या सरी येत आहेत. उघडीप मिळाली आणि वापसा आला की शेतकरी खरिपाच्या पेरणीची कामे करत असल्याचे दिसून येत आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासांत कोयनानगर व नवजाला ५६ मिलिमीटर व महाबळेश्‍वरला ९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणाची पाणीपातळी २०२९.१० फूट झाली असून, पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत असून, धरणाचा एकूण पाणीसाठा १०.९५ टीएमसी झाला आहे.

धरणाच्या पाण्याने तळ गाठल्याने २२ जून रोजी पायथा वीजगृहातून होणारा एक हजार ५० क्यूसेस विसर्ग बंद करण्यात आला होता. तो पुन्हा सुरू करण्यात आला असून, कोयना नदीपात्रात एक हजार ५० क्यूसेस पाण्याचा विसर्ग होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT