Udayanraje Bhosale esakal
सातारा

आबांची भाषणं ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला

बाळकृष्ण मधाळे

सातारा : ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले असून विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केलीय. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठीही त्यांनी कायम संघर्ष सुरुच ठेवला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला, अशी भावना खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनी गणपतराव देशमुख यांच्या प्रति व्यक्त केलीय. (MP Udayanraje Bhosale Reaction After Ganpatrao Deshmukh Passed Away bam92)

1962 ला आबांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली. सुरूवातीपासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष हाच त्यांचा श्वास राहिला आहे.

आदरणीय देशमुख साहेबांची 'आबा' या नावानं खास ओळख होती. फायलींचं बंडल जवळ घेऊन आबा नेहमी विधिमंडळ आवारात दिसायचे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कधी विधिमंडळ कामकाज चुकवल नाही. 'विधिमंडळाचे विद्यापीठ' असंही काही लोक त्यांना संबोधायचे, यात काही खोटं नसवीच. कारण, दिग्गज नेतेमंडळी काहीही जुना संदर्भ हवा असेल, तर आबांकडे जायचे आणि आबाही तेवढ्याच आपुलकीने एखादी गोष्ट समजून सांगायचे. विधिमंडळाच्या कामकाजातही एखाद्या विषयावर खल सुरू असेल किंवा वादाचा विषय असेल, तर बोलण्यासाठी अथवा मत मांडण्यासाठी सदस्य मंडळी गोंधळ करायचे. मात्र, अशावेळी कितीही गोंधळ सुरू असला आणि आबा बोलायला उभे राहिले, की सभागृह शांत होऊन त्यांचं ऐकायचं. आबा उभे राहताच दोन्हीकडील मंडळी 'आबांना बोलू द्या' असं म्हणत शांत राहायची. अगदी शांतपणे आबा आपला मुद्दा मांडायचे, चर्चा करायचे. आबांच्या एवढा असा रिस्पेक्ट कदाचितच कुणाला मिळत असेल.

उदयनराजे पुढे म्हणाले, 1962 ला आबांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढवली. सुरूवातीपासून गणपतराव देशमुख शेतकरी कामगार पक्ष हाच त्यांचा श्वास. शेकापचा गढ आबांनी कित्येक वर्षे अबाधित ठेवला. आबा मंत्रीही झाले. मात्र, त्यांचा साधेपणा कायम अबाधित राहिला. कित्येकदा आबांच्या 'एसटीने प्रवासाच्या' बातम्या यायच्या. आता एसटी महामंडळाने आमदारांसाठी राखीव सीट रद्द केले तरी हरकत नाही. कारण, एसटीने प्रवास करणारा आमदार गेलाय, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आज साधा नगरसेवक मनुष्य असला तरी तो कित्येक पिढ्यांची माया उभारून ठेवतो किंवा त्यांचं सामाजिक वावरणं पाहिल्यावर डोळे अचंबित होतात. मात्र, 50 हुन अधिक वर्ष आमदार राहिलेले आबा आपला साधेपणा आपल्या सोबतच घेऊन गेले, असेही त्यांनी सांगितले.

Ganpatrao Deshmukh

अधिवेशनात आबांच्या विधिमंडळातील 50 पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष प्रस्ताव आणला होता. देशामध्ये सर्वाधिक वेळा निवडून येण्याचे रेकॉर्ड करणारे गणपतराव देशमुख अर्थात आबासाहेब हे सर्व सदस्यांसाठी आदराचे आणि प्रेरणेचे स्रोत होते. त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी नेहमीच त्यांना यशोशिखरावर घेऊन गेली. 51 वर्ष विरोधी पक्षात काम करून एक अनोखी चळवळ त्यांनी उभी केली. शेतीप्रश्न आणि पाणीप्रश्न असला, की त्यांच्याकडून कित्येकदा माहितीचा खजिना मिळतो. त्यांच्याकडून खूप सदस्यांना शिकायला मिळाले असून सुवर्णअक्षरांनी लिहावी अशी त्यांची कारकीर्द असल्याचेही मत खासदार उदयनराजे यांनी व्यक्त केले.

MP Udayanraje Bhosale Reaction After Ganpatrao Deshmukh Passed Away bam92

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

Accident News: देव तारी त्याला...! पाच मजली इमारत कोसळूनही तीन महिन्यांची चिमकुली सुखरुप बचावली, 27 जणांचा मृत्यू

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Mutual Fund: 3,000 रुपयांची SIP की 3 लाख रुपयांची Lumpsum: 30 वर्षांनंतर कोण देणार जास्त परतावा?

Nagpur Crime: नागपूर हादरलं! प्रियकराच्‍या मदतीने पतीचा खून; उत्तरीय चाचणीच्या अहवालातून खुलासा

SCROLL FOR NEXT