Udayanraje Bhosale esakal
सातारा

मराठा आरक्षणासाठी दिल्लीच्या तख्ताला धडक; उदयनराजेंकडून कृतिशील भूमिकेची अपेक्षा!

मराठा आरक्षणाची लढाई आता पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. मराठा समाजाला उदास होऊन हार स्वीकारून बसणे चालणार नाही.

प्रवीण जाधव

सातारा : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे (Supreme Court Order On Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) वाटेत मोठा रोडा निर्माण झाला आहे. या स्थितीत आरक्षण कसे देणार किंवा त्याची भरपाई कशी करणार, याबाबत अद्याप राज्य शासनाकडूनही भूमिका स्पष्ट झालेली नाही. भाजपच्या नेतृत्वाकडूनही केंद्र शासनाकडून कोणत्याही परिस्थितीत त्यावर मार्ग काढला जाईल, असा दावा केला जात नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांची जबरदस्त मानसिकता असावी लागणार आहे. ती निर्माण करण्यासाठी समाजातून पुन्हा एकदा मोठा उठाव करावा लागेल. पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला धडक द्यावी लागणार आहे. त्यासाठी खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje Bhosale) यांनाच कृतिशील धोरण ठरवून कंबर कसावी लागणार आहे. (MP Udayanraje Bhosale Role Regarding Maratha Reservation Is important Satara News)

मराठा आरक्षणाची लढाई आता पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. मराठा समाजाला उदास होऊन हार स्वीकारून बसणे चालणार नाही.

अनेक वर्षांचा संघर्ष व शांतताप्रिय प्रदर्शनांनंतर मराठा समाजाला मागास आयोगाच्या शिफारशीनुसार शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले. परंतु, सर्वोच्च न्यायालयातील लढ्यात मराठ्यांना अपयश आले. दिल्लीच्या धरतीवर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने मराठ्यांचे पानिपत झाले. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने गायकवाड अहवालाच्या शिफारशीनुसार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती असल्याचे मान्य केले नाही. त्याचबरोबर खंडपीठातील पाचपैकी तीन न्यायाधिशांनी एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार 102 व्या घटनादुरुस्तीनुसार नसल्याचे मत मांडले आहे.

आरक्षणासाठी झालेल्या मराठा आंदोलनामध्ये समाजातील लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर राजकीय नेतेही आंदोलनात उतरले. त्यामध्ये खासदार उदयनराजेंनीही वेळावेळी आक्रमक भूमिका मांडली. त्याची तत्कालीन सरकारला धडकी भरत होती. मराठा मोर्चाचे समन्वयकही उदयनराजेंच्यासोबत कोणत्याही पातळीवर आंदोलनात उतरण्याची तयारी दर्शवित होते. त्यांच्याइतके समर्थन अन्य कोणत्या नेत्याच्या वाट्याला आल्याचे दिसले नाही. त्या वेळी उदयनराजे हे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये होते. तत्कालीन भाजप सरकारने आरक्षणाचा कायदा केल्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपची वाट धरली. नंतरच्या काळातही राज्य सरकारकडून आरक्षणप्रश्‍नी ढिलाई दिल्यावर उदयनराजेंकडून जोरदार आवाज उठविला गेला होता.

सर्वांच्या प्रयत्नानंतरही सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाची लढाई आता पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. मराठा समाजाला उदास होऊन हार स्वीकारून बसणे चालणार नाही. राज्य सरकारला तातडीने योग्य भूमिका घेत मार्ग काढायला लावावा लागणार आहे. निकालाने नाकारले ते सर्व समाजाला देण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आश्‍वासनाला पूर्तीकडे न्यावे लागणार आहे. केंद्राकडे प्रकरण गेल्यास केंद्र शासनाला त्यासाठी सकारात्मक भूमिका घेण्यासाठी सकारात्मक करावे लागणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांवर दबाव निर्माण करावा लागणार, हे नक्की. त्यासाठी आंदोलनाची नियोजनबद्ध दिशा ठरवावी लागणार आहे. अनेक नेत्यांच्या आजवर प्रतिक्रिया आल्या. परंतु, राज्यातील मराठा समाज उदयनराजेंच्या कृतिशील भूमिकेकडे लक्ष ठेऊन आहे.

नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागणार

केंद्र शासनाकडे शिफारस करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा एक मार्ग अद्याप शिल्लक आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी सर्वच राजकीय पक्षांची भूमिका आहे. परंतु, त्यासाठी आत्ता दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याशिवाय पर्याय राहिलेला दिसत नाही. त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आखावा लागणार आहे.

MP Udayanraje Bhosale Role Regarding Maratha Reservation Is important Satara News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidri Sugar Factory : शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला यश ,‘बिद्री’ साखर कारखान्याचा उस दराबाबत 'यु टर्न' ३ हजार ६१४ पहिली उचल एकरकमी देणार

Sindhudurg Heritage : दोनशे वर्षांपूर्वीची ब्रिटिशकालीन दोन स्मारके तोडली, मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळची घटना

Latest Marathi News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघावरून महायुतीत धुसफुस

पेशव्यांना होतं पैठणीचं आकर्षण! सोळा हात लांब, तीन किलो वजन; शुद्ध सोन्याच्या जरीची पेशवेकालीन पैठणी कशी होती?

Shashikant Shinde: पोलिसांविरोधात आमदार शशिकांत शिंदे आक्रमक; कोरेगावात मोर्चा; बैठकीबाबतचे पत्र दोन दिवसांत द्यावे, नेमंक काय प्रकरण..

SCROLL FOR NEXT