Hasan Mushrif Balasaheb Patil esakal
सातारा

Balasaheb Patil : 'पुरोगामी महाराष्ट्रात असलं चालणार नाही, मुश्रीफ लवकरच ED ला उत्तर देतील'

'अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरही ईडीनं कारवाई केली. मात्र, ते बाहेर आले.'

हेमंत पवार

कऱ्हाड : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या घरावर, ऑफिसवर ईडीनं छापा टाकला. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वीही इन्कम टॅक्सनं छापा टाकला होता. अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरही ईडीनं कारवाई केली. मात्र, ते बाहेर आले. मुश्रीफ त्याला कायदेशीर मार्गानं उत्तर देतील, असा विश्वास व्यक्त करत माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी मुश्रीफांची पाठराखण केली.

आमदार पाटील म्हणाले, 'एखाद्या व्यक्तीला टार्गेट करायचं. आरोप मोठा करुन त्याला समाजातून उठवायचं अशा पद्धतीचं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. देशात काही लोकांच्या सांगण्यावरून केंद्र व राज्यातील यंत्रणा काम करत आहेत. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे चालणार नसून ते लोकशाहीच्या दृष्टीनं मारक आहे.'

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर राज्यपाल टीका करत आहेत. महात्मा जोतिबा फुले यांनी शिक्षणाची दारं खुली केली. त्यांच्याबाबतीत एक मंत्री (चंद्रकांत पाटील) भिक मागून शिक्षण दिलं, असं ते म्हणाले. शिवाय, एका मंत्र्यानं शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. त्याबद्दल भाजपचे नेते बोलायला तयार नाहीत. केवळ महापुरुषांचा अपमान करण्याचं काम सुरु आहे. प्रादेशिक असमतोल वाढत चालला आहे. व्देषावर आधारित काम सुरु आहे. आरोप मोठा करायचा आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना अटक करायची, असं सत्र सुरु आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम त्यांच्याकडून सुरु आहे, असा आरोपही आमदार पाटील यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

SCROLL FOR NEXT