Shashikant Shinde News esakal
सातारा

Shashikant Shinde : तुमचं पाप दुसऱ्याच्या माथी फोडू नका, आता तुमच्या पापाचा घडा भरलाय; आमदार शिंदेंचा भाजपला इशारा

भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

सकाळ डिजिटल टीम

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून आमदार शिंदे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली.

सातारा : कंत्राटी भरती रद्द केल्यानंतर भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीच्या विरोधात झालेले आजचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. मागील अधिवेशनात कंत्राटी भरतीचे बिल तुम्हीच मंजूर केले होते, आता का बदलत आहात. हे तुमचे पाप असून, ते दुसऱ्याच्या माथी फोडू नका. तुमच्या पापाचा घडा भरलाय, असा इशारा आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी दिला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावरून आमदार शिंदे यांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ‘‘राज्यात सरकार भाजपचे, गृहमंत्री त्यांचाच, त्यांच्याच सरकारने निर्णय घेतलेला असताना भाजप आंदोलन करतंय ही हस्यास्पद बाब आहे. या बिलाला आम्ही विधीमंडळात विरोध केला होता.

त्या वेळी कोरोना काळात भरती करू शकत नसताना प्रक्रियेला विलंब लागत असल्याने ११ महिन्यांसाठी कंत्राटी भरती करतोय, असे गृहमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले होते. असे असताना त्यांनी पवारसाहेब व उद्धव ठाकरेंच्या काळात झाले असल्याचे सांगत धडधडीत खोटे बोलत आहेत. लोकांचा यावर आता विश्वास राहिलेला नाही. प्रत्येक वेळी महाविकास आघाडी जबाबदार असल्याचे सांगत पळवाटा काढण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. जनतेचा रोष पाहून भाजपने आज आंदोलन केले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

ससूनमधून माणूस पळतो...

ललित पाटील प्रकरणावर आमदार शिंदे म्हणाले, ‘‘तुमच्या कारकिर्दीत माणूस ससूनमधून पळून जातो. त्यांच्या अपयशाचे खापर दुसऱ्यावर फोडायचे आहे. पोलिस भरतीबाबत राज्यातून तीव्र नाराजी होऊ लागल्याने भाजपने हे आंदोलनाचे नाटक केलेले आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT