Vaccination Center esakal
सातारा

लसीकरणासाठी पुणे-कोल्हापुरातील लोक सातारा केंद्रांवर; ई-पासशिवाय बाहेरच्यांना जिल्ह्यात प्रवेश?

कोरोना संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाने लसीकरणाला सुरवात केली आहे.

प्रवीण जाधव

सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) लशीचा तुटवडा असल्यामुळे 18 ते 44 वयोगटामध्ये लस घेण्यासाठी पुणे व कोल्हापूरमधील (Pune-Kolhapur) लोक सातारा जिल्ह्यातील केंद्रांवर नोंदणी करताना दिसत आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर (Vaccination Center) बाहेरच्या जिल्ह्यातील नंबरप्लेट असलेल्या वाहनांची गर्दी आहे. परिणामी, जिल्ह्यातील नागरिकांना लस मिळत नाही. निर्बंध असताना बाहेरून लोक येतात कसे, असा प्रश्‍न त्यामुळे उपस्थित झाला आहे. (People From Pune-Kolhapur Are Coming To Satara Centers For Vaccination)

कोरोना संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी शासनाने लसीकरणाला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य सेवक व त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे एक मेपासून 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाला सुरवात झाली. 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन व ऑफलाइन (Online And Offline) नोंदणीची संधी होती. तसेच त्यांना लसीकरणासाठी आगाऊ वेळ घेता येत नव्हती. लसीकरण केंद्रावर रांगा लावूनच त्यांचे लसीकरण होत होते. परंतु, 18 ते 44 या वयोगटातील नोंदणीसाठी शासनाने केवळ ऑनलाइनच नोंदणीची प्रक्रिया ठेवली. त्याचबरोबर त्यांना लसीकरण नोंदणींबरोबरच लसीकरणाची वेळही आगाऊ नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांना लसीकरणाची वेळ मिळाली आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर लस दिली जाते.

जिल्ह्यामध्ये सध्या सातारा, कोरेगाव, खटाव, दहिवडी, फलटण, शिरवळ, वाई, मेढा, महाबळेश्‍वर, कऱ्हाड, पाटण अशा 11 ठिकाणी 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी लसीकरण केंद्रे सुरू आहेत. परंतु, या केंद्रांवर बाहेरच्या जिल्ह्यातूनही लोकही लसीकरणासाठी येत असल्याचे समोर येत आहे. लसीकरणासाठीची नोंदणी ऑनलाइन आहे. त्याचबरोबर वेळ घेण्याची पद्धतही. त्यामुळे कोणीही, कोठूनही, कोणत्याही ठिकाणी लसीकरणाची वेळ घेऊ शकतो. जिल्ह्यालगतच्या काही जिल्ह्यांमध्ये लसीकरणासाठी अनेक दिवस वेळ मिळत नाही. त्यामुळे तेथील लोक सातारा जिल्ह्यातील केंद्रांवर लसीकरणासाठी नोंदणी करत आहेत. अनेक लसीकरण केंद्रांवर बाहेरच्या जिल्ह्यातील नंबर प्लेटच्या गाड्या दिसत आहेत. परिणामी, स्थानिक नागरिकांना लसीकरणासाठी वेळ उपलब्ध होत नाही. जिल्ह्याच्या यंत्रणेवर बाहेरच्या जिल्ह्यातील लसीकरण होत असल्याने या वयोगटातील जिल्ह्यातील लोकांच्या लसीकरणात प्रत्यक्षात जिल्हा मागे पडण्याची चिन्हे आहेत.

जिल्हाबंदीत इतर जिल्ह्यांतील वाहनांना प्रवेश

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध आहेत. अत्यावश्‍यक कारण असले तरीही ई-पासशिवाय जिल्ह्याच्या बाहेर जाता येत नाही. अशा स्थितीत बाहेरच्या जिल्ह्यातून लोक येतातच कसे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सीमांवर पोलिसांकडून तपासणी होते की नाही, असाही मुद्दा समोर येत आहे.

लसीकरणासाठी दररोज 11 वाजता होणार नोंदणी

एक मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणासाठी ऑनलाइन नोंदणी करून वेळ घ्यावी लागत आहे. परंतु, साईटवर बुकिंग कधी सुरू होते, हे नागरिकांना समजत नाही. यंत्रणेतील संबंधितांना याबाबतची माहिती मिळत होती. त्यांच्याकडून ज्यांना वेळ समजायची त्यांचेच बुकिंग होत होते. या वयोगटातील लोकसंख्या जास्त असल्याने काही मिनिटांतच सर्व बुकिंग होत आहे. त्याचबरोबर ही वेळही दररोज बदलत होती. त्यामुळे सर्वांना संधी उपलब्ध होण्यासाठी आता दररोज सकाळी 11 वाजता जिल्ह्यासाठीचे बुकिंग खुले केले जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.

People From Pune-Kolhapur Are Coming To Satara Centers For Vaccination

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT