Loknete Balasaheb Desai Memorial esakal
सातारा

Satara : वाद सुरू असतानाच लोकनेत्‍याच्या स्‍मारकाचे फोटो व्‍हायरल; उदयनराजे, शंभूराज देसाईंनी स्पष्ट केली भूमिका

बाळासाहेब देसाई यांच्‍या प्रस्‍तावित स्‍मारकाच्‍या (आयलँड)अनुषंगाने वाद सुरू असतानाच त्‍याबाबतची छायाचित्रे (थ्रीडी इमेज) समाजमाध्‍यमांवर व्‍हायरल झाली.

सकाळ डिजिटल टीम

सातारा : साताऱ्यात होणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई (Balasaheb Desai) यांच्‍या प्रस्‍तावित स्‍मारकाच्‍या (आयलँड)अनुषंगाने वाद सुरू असतानाच त्‍याबाबतची छायाचित्रे (थ्रीडी इमेज) समाजमाध्‍यमांवर व्‍हायरल झाली.

या तीन प्रकारच्‍या छायाचित्रांमुळे स्‍मारकाच्या अनुषंगाने हालचाली सुरू असल्‍याचे समोर येत आहे. याबाबत पालिकेतील वरिष्‍ठांशी संपर्क साधला असता, त्‍यांनी तशा प्रकाराची कोणतीही कार्यवाही सद्य:स्‍थितीत पालिकास्‍तरावर झाली नसल्‍याची माहिती दिली.

गेल्‍या आठ दिवसांपासून पोवई नाका परिसरात होणाऱ्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्‍या प्रस्‍तावित स्‍मारक (आयलँड) वरून वादंग सुरू आहे. या स्‍मारकास विरोध दर्शवत शिवप्रेमी तसेच उदयनराजे समर्थकांनी याबाबतची निवेदने जिल्‍हा प्रशासनास दिली आहेत.

याच अनुषंगाने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही प्रतिक्रिया नोंदवत लोकनेत्‍यांचे स्‍मारक इतरत्र कोठेही होऊ शकते, अशी टिप्पणी केली होती. या प्रस्‍तावित स्मारकाच्या अनुषंगाने वादंग सुरू असतानाच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोवई नाका परिसरातच लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्‍मारक होणार, अशी स्‍पष्‍ट भूमिका जाहीर केली.

ही भूमिका जाहीर करत असतानाच त्‍यांनी याबाबतची कार्यवाही करण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, पालिकेचे मुख्‍याधिकारी अभिजित बापट व इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीतील तपशील समोर आला नसला तरी स्‍मारकाच्‍या अनुषंगाने कार्यवाही गतिमान झाल्‍याचे संकेत मिळत होते.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रस्‍तावित स्‍मारकाची छायाचित्रे रविवारी समाज माध्‍यमांवर व्‍हायरल झाली. या छायाचित्रांमध्‍ये तीन प्रकारच्‍या छायाकृती आहेत. यामुळे प्रस्‍तावित स्‍मारकाच्‍या अनुषंगाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्‍या पातळीवर गतिमान कार्यवाही सुरू असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet: गरिबांसाठी हक्काची घरे, शेतकऱ्यांनाही दिलासा; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठ्या निर्णयांची घोषणा

District Bank election:चुकीचे लोक नकोत, म्हणून स्वाभिमान बाजूला ;डॉ. सुजय विखे पाटील ; जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकऱ्याचे हित महत्त्वाचे

Central Railway: प्रवाशांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर ७५ दिवसांचा विशेष ब्लॉक, मेल/एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

Marathi News Live Updates: आंबेगाव तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर धडक कारवाई; सात हायवा जप्त

Retirement Planning: रिटायरमेंटनंतर आरामात जगण्यासाठी 1.5 कोटी पुरेसे नाही? HDFC पेन्शनच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT