Shashikant Shinde
Shashikant Shinde esakal
सातारा

न केलेल्या कामाचं श्रेय लाटणं बंद करा; सेनेच्या आमदाराला NCP चं प्रत्युत्तर

राजेंद्र वाघ

आमदार महेश शिंदे यांना श्रेयवादाची साथ जडली आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आहे.

कोरेगाव (सातारा) : शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) कोरेगाव मतदारसंघाचे (Koregaon Constituency) आमदार झाल्यानंतर २०१३-२०१४ मध्ये त्यांनी तालुक्यातील तळीये-नलवडेवाडी-जांब या खिंड रस्त्यासाठी वन हद्दीतील जमीन संपादनास जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून २० लाखांची तरतूद करून घेतली होती आणि तेव्हापासून त्यांनी वेळोवेळी या रस्त्यासाठी पाठपुरावा केल्याने या कामाचे श्रेय त्यांनाच आहे. त्यामुळे श्रेयवादाची साथ जडलेल्या आमदार महेश शिंदे यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उत्तर दिले आहे.

तळीये-नलवडेवाडी-जांब या खिंड रस्त्याला मंजुरी मिळवून निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे आमदार महेश शिंदे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यांना राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, सदस्य डॉ. अभय तावरे, सभापती राजाभाऊ जगदाळे, माजी सभापती संजय झंवर, तानाजीराव मदने, तालुकाध्यक्ष भास्कर कदम, प्रताप कुमुकले, अॅड. पी. सी. भोसले, अॅड. अमोल राशीनकर, राहुल साबळे, प्रशांत पवार, विकास घोरपडे, चरण मोहिते यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या कामाचे श्रेय जरूर घ्यावे; परंतु न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असे नमूद करून श्री. महाडिक म्हणाले, ‘‘आमदार शशिकांत शिंदे यांनी १८ सप्टेंबर व २५ नोव्हेंबर २०१४ रोजी नियोजन मंडळाच्या बैठकीपुढे या रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या वन हद्दीतील जमीन संपादनास २० लाखांची तरतूद झाली होती. हे काम सुचवणारे म्हणून त्यांचा इतिवृत्तामध्ये उल्लेख आहे. या कामासाठी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी वेळोवेळी बैठका घेऊन पाठपुरावा केल्याने या कामाचे श्रेय त्यांनाच आहे.’’

सभापती जगदाळे म्हणाले, ‘‘आमदार महेश शिंदे यांना श्रेयवादाची साथ जडली आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्याचा त्यांचा प्रयत्न पूर्णपणे चुकीचा आहे. त्यांच्या आमदारकीला दोन वर्षे व्हायची आहेत. वन हद्दीतील जमीन संपादनासाठी पर्यायी जमीन उपलब्ध करून द्यावी लागते, ती कोणत्या ठिकाणची व कधी दिली आहे, हे त्यांना माहीत आहे का? पाटण तालुक्यामध्ये पर्यायी जमीन दिली आहे. संपादनासाठीची काही रक्कम भरली आहे, उर्वरित रक्कम भरावयाची आहे. या रस्त्याच्या कामाला अद्याप अंतिम यश आलेले नाही, ते लवकरच येईल. ल्हासुर्णे, कुमठे येथील आरोग्य केंद्रे आम्ही मंजूर करून घेतली. डॉ. तावरे व मी स्वतः आरोग्य समितीमध्ये आहे. आम्ही उद्‍घाटने केल्यानंतर त्यांनीही केली. बर्गेवाडी येथील पाणी योजनेचे आम्ही उद्‍घाटन केल्यानंतर चार दिवसांनी पुन्हा त्यांनी उद्‍घाटन केले. त्यांनी प्रलंबित कामे पूर्ण करावीत व त्या कामांचे श्रेय घ्यावे.’’ आपापल्या कामाचे श्रेय ज्याने त्याने घ्यावे, न केलेल्या कामाचे श्रेय घेऊन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला श्री. झंवर यांनी लगावला.

शंकररावअण्णांच्या सूचनेनुसार कार्यवाही

शशिकांत शिंदे यांच्या २००९ मधील कोरेगावातील पहिल्या निवडणुकीत त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप होते. त्यांनी वन हद्दीतील जमीन संपादनामुळे रखडलेले रस्ते पूर्ण करण्याची व माझ्याकडून राहिलेली ही कामे पूर्णत्वास नेण्याची सूचना माझ्यासमोर केल्याचे व त्यानुसार शशिकांत शिंदे यांनी कार्यवाही केल्याने ही कामे मार्गी लागत असल्याचे संजय झंवर यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT