Dahivadi Society Election esakal
सातारा

ऐन थंडीत सोसायट्यांच्या निवडणुकांनी राजकारण तापलं

रुपेश कदम

निवडणुकांमुळे ऐन थंडीत माणचे राजकीय वातावरण तापले आहे.

दहिवडी (सातारा) : विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे (Dahivadi Society Election) ऐन थंडीत माणचे राजकीय वातावरण तापले आहे. तालुक्यात विकास सेवा सोसायटी निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, एकूण १६ विकास सेवा सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सध्या आहे. अजूनही काही सोसायट्यांची निवडणूक आगामी काळात लागण्याची शक्यता आहे. (Politics begins in Dahiwadi Vikas Seva Society election 2022)

कोविडमुळे (Coronavirus) आपत्तीचा सामना करत असताना शासनाने विविध निवडणुकांना सुद्धा स्थगिती दिली होती. अनेक विकास सेवा सोसायट्यांच्या कालावधी दीड वर्षापूर्वीच संपला असताना त्या निवडणुकाही लांबणीवर पडल्या होत्या. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शासनाने अनेक व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू केले आहेत. त्यामुळे रखडलेल्या निवडणुकांची प्रक्रियासुद्धा सुरू झाली. सोसायटी निवडणूक प्रक्रिया सुद्धा सुरळीतपणे सुरू झाली आहे. १० जानेवारीपासून तालुक्यातील १६ विकास सेवा सोसायट्यांच्या निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. आतापर्यंत नऊ सोसायट्यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित सात सोसायटीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहायक दुय्यम निबंधक कार्यालयाने जाहीर केल्यानुसार नऊ फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत टप्प्याटप्प्याने १६ सोसायट्यांसाठी मतदान होणार आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या (Satara District Bank Election) दृष्टीने विकास सेवा सोसायटी संचालकांच्या ठरावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिल्हा बँकेच्या मागील काही निवडणुकांसाठी झालेला घोडेबाजार व साठमारी बघता सोसायटी संचालक होण्याची अनेकांची सुप्त इच्छा आहे. नेतेमंडळींनीसुद्धा सोसायटींवर आपल्या विचारांचे लोक निवडून यावेत, यासाठी रसद पुरविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सोसायटी निवडणुकांच्या निमित्ताने गावोगावी राजकारणाचा फड रंगला आहे.

मतदानाचा महिना, तारीख व गावाचे नाव

फेब्रुवारी ः ९- काळचौंडी, १०- तोंडले, ११- शेनवडी, १३- बिजवडी, १४- गंगोती, १५- रांजणी, १६- पानवन, १८- खुटबाव, २०- वावरहिरे, २४- विरळी, २६- हिंगणी, २७- पळशी.

मार्च ः १- पाचवड, २- मोही, ३- म्हसवड (नं. १), ४- शिंगणापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT