Pusesawali Riots esakal
सातारा

Pusesawali Riots : उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीतील जनजीवन सुरळीत; अद्यापही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

पोलिस बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे.

सकाळ डिजिटल टीम

चौथ्या दिवशी शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

राजाचे कुर्ले : आक्षेपार्ह पोस्टवरून उसळलेल्या दंगलीनंतर (Pusesawali Riots) विस्कळित झालेले पुसेसावळी येथील जनजीवन प्रशासनाच्या प्रयत्नानंतर कालपासून सुरळीत होऊ लागले आहे. प्रशासनाच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी दुकाने उघडल्याने काहीअंशी तणाव दूर होण्याबरोबरच आर्थिक उलाढाल सुरू झाली.

गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर गणेशमूर्ती व्यावसायिकांनी आपले स्टॉल तसेच गणपती सजावटीच्या साहित्याची दुकाने उघडण्यास सुरुवात केली आहे. दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुसेसावळी येथे तणावपूर्ण शांतता होती. त्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात आहे.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष ठेवले होते. शांततेचे व सलोख्याचे वातावरण कायम ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास पुसेसावळीकरांनी प्रतिसाद दिला. चौथ्या दिवशी शहरातील व्यवहार सुरळीत सुरू झाले असून, जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ऑनलाइन स्वरूपातील व्यवहार सुरू झाले असून, ई बिल, चेक क्लिअरन्स प्रक्रिया सुरू झाल्याने व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांना दिलासा मिळाला. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांनी आपापल्या पाल्यांना आज शाळेत पाठवले. गेल्या तीन दिवसांपासून बंद असलेली बॅंक सेवा सुरू झाल्यामुळे अनेकांनी बॅंकिंगसंदर्भात कामे उरकण्यावर भर दिला. दरम्यान, पोलिस बंदोबस्त आजही कायम ठेवण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT