Superintendent of Police Sameer Shaikh esakal
सातारा

पुसेसावळी दंगलीचे ठोस पुरावे न्‍यायालयात सादर करणार; पोलिस अधीक्षकांनी दिली महत्त्वाची अपडेट, मुस्लिम बांधवांना मिळणार न्याय?

'याविषयी आताच फार काही सांगता येणार नाही.'

सकाळ डिजिटल टीम

पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्या हत्येप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील २३ जणांना अटक करण्यात आली होती.

सातारा : पुसेसावळी प्रकरणाचा (Pusesawali Riots) तपास योग्‍य दिशेने सुरू असून, त्‍याबाबतचे ठोस पुरावे संकलित करण्‍यात येत आहेत. या पुराव्‍यांची मांडणी न्‍यायालयासमोर करण्‍यात येत असल्‍याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख (Sameer Sheikh) यांनी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेदरम्‍यान दिली.

पुसेसावळी दंगलप्रकरणी सुरू असणाऱ्या तपासाबाबत विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर त्‍यांनी ही माहिती दिली. या प्रकरणाचा तपास करत संशयितांना अटक करण्‍यात आली असून, त्‍यांना चौकशीसाठी स्‍थानिक गुन्‍हे शाखेत (Satara Police) आणण्‍यात आले आहे. याविषयी आताच फार काही सांगता येणार नाही. या प्रकरणी ठोस पुरावे संकलित करण्‍याचे काम सुरू असल्‍याचे शेख यांनी या वेळी सांगितले.

पुसेसावळीतील आणखी एक अटकेत

आक्षेपार्ह पोस्‍टनंतर पुसेसावळी येथे जमावाने केलेल्‍या तोडफोड, जाळपोळ आणि हत्‍येप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्‍ह्यात स्‍थानिक गुन्‍हे शाखेच्‍या पथकाने आणखी एकास अटक केली आहे. राहुल कदम ऊर्फ आर. के. (रा. पुसेसावळी) असे त्‍याचे नाव असून, त्‍याला न्‍यायालयाने ता. १८ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्‍याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत या प्रकरणात एकूण २० जणांना अटक करण्‍यात आली असून, त्‍या सर्वांची रवानगी कोठडीत करण्‍यात आली आहे.

सोळा जणांना न्यायालयीन कोठडी

औंध : पुसेसावळी येथील दंगल आणि नूरहसन शिकलगार यांच्या हत्येप्रकरणी दाखल असणाऱ्या गुन्ह्यातील २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यातील १६ जणांच्या गुन्ह्याचा तपास औंध पोलिस ठाण्याच्या अंतर्गत आहे. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणण्यासह दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण १६ जणांना काल वडूज येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.

या प्रकरणी अटकेत असणाऱ्या १६ जणांना ३० सप्टेंबरअखेर न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली आहे. औंध पोलिस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संशयितांना अतिरिक्त पोलिस संरक्षणासह कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात नेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT