Pusesawali Riots Karad esakal
सातारा

Pusesawali Riots : उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीत काय आहे स्थिती? मोठा पोलिस बंदोबस्त तैनात, शाळा-बाजारपेठ पूर्णपणे बंद

उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीत तणावपूर्ण शांतता

सकाळ डिजिटल टीम

पुसेसावळी दंगलप्रकरणी कालपर्यंत पोलिसांनी २३ जणांना अटक केली होती.

राजाचे कुर्ले : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकुरामुळे उसळलेल्या दंगलीनंतर पुसेसावळीत (Pusesawali Riots) तणावपूर्ण शांतता आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या (Police Force) दोन तुकड्या काल मुख्य चौकात तैनात करण्यात आल्या होत्या.

दोन दिवसांपासून विटा, कऱ्हाड भागातून बंद असलेली वाहतूक सकाळपासून पुसेसावळी (बायपास मार्गे) पुन्हा सुरू करण्यात आली असून, अत्यावश्‍यक सेवा वगळता बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे. पुसेसावळीत सोमवारी रात्री उशिरा उसळलेल्या दंगलीत प्रार्थनास्थळावर हल्ला, दुकानांची तोडफोड, गाड्यांची जाळपोळीची घटना घडली होती.

या दंगलीच्या पार्श्‍वभूमीवर पुसेसावळीत तणावपूर्ण शांतता असून, प्रार्थनास्थळ, मंदिरांना मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुसेसावळीत मुख्य बाजारपेठ पूर्णत: बंद असून, अन्य भागातील दुकाने सायंकाळच्या सुमारास काही प्रमाणात उघडण्यात आली. पुसेसावळी व परिसरातील शाळादेखील दोन दिवसांपासून बंद ठेवण्यात आल्या आहेत.

दंगलीनंतर गावातील बहुतांश नागरिक घरातून बाहेर पडण्यास धजावत नसल्याने रस्तेदेखील ओस पडले आहेत. गावातील अंतर्गत रस्ते सुरू करण्यात आले आहेत. मात्र, मुख्य चौक, प्रार्थनास्थळांजवळील रस्ते पोलिसांनी बॅरिकेडस् लावून बंद ठेवण्यात आले आहेत. विटा, कऱ्हाड भागांतून पुसेसावळीत येणारी बंद ठेवण्यात आलेली वाहतूक पुन्हा सुरू केली आहे.

मात्र, पुसेसावळीत वाहने न पाठविता बायपासमार्गे सुरू आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक समीर शेख सायंकाळी पाच वाजण्याचा सुमारास परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पुसेसावळीत दाखल झाले होते, तर अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर दुपारपासून पुसेसावळीत तळ ठोकून आहेत. राज्य राखीव पोलिस दल, सातारा, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील पोलिसांची बंदोबस्तासाठी तैनात आहे.

आजपासून व्यवहार सुरळीत

पुसेसावळीत शांततेचे आवाहन करण्यासाठी दोन्ही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांसमवेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिस ठाण्यात बैठक घेतली. या वेळी आजपासून सर्व व्यवहार सुरळीत सुरू करून सर्वत्र शांतता राखण्याबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक अश्‍विनी शेंडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, औंध पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धोंडिराम वाळवेकर उपस्थित होते.

जयराम स्वामी वडगाव येथील नऊ जण ताब्यात

औध : पुसेसावळी दंगलप्रकरणी कालपर्यंत पोलिसांनी २३ जणांना अटक केली होती. अटकेतील संशयितांकडे चौकशीबरोबर पुसेसावळीसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. फुटेजची तपासणी, तांत्रिक माहितीच्या आधारे दंगलीतील सहभागींचा तपास वेगात सुरू आहे.

अशाच तांत्रिक तपासाच्या आधारे मंगळवारी औंध पोलिसांनी जयरामस्वामी वडगाव (ता. खटाव) येथील नऊ जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषणने ताब्यात घेतले आहे. जयराम नागमल, दादासो माळी, ज्योतिराम बाडुगळे, श्रीनिवास कदम, विजय निंबाळकर, विनायक पवार, किशोर कदम, किरण घाडगे, बापूसो पवार अशी त्यांची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या नऊ जणांचा दंगलीमध्ये कितपत सहभाग होता आणि त्यांच्यासोबत त्यावेळी कोणकोण होते याचा शोध पोलिसाकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT