Kharif season 2021
Kharif season 2021 esakal
सातारा

पिकांचं नुकसान झालंय? 72 तासाच्या आत कळवा कृषी विभागाला माहिती

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : खरीप हंगाम 2021 (Kharif season 2021) मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना (Prime Minister Crop Insurance Scheme) सातारा जिल्ह्यात राबवली जात आहे. या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन (Landslide), विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण (Insurance protection) प्राप्त होते. जुलै महिन्यामध्ये काही भागात अतिवृष्टीने (Heavy Rain in Satara) तसेच पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झल्याने शेत पिकांचे (Farm Crop) नुकसान झाल्याचे निदर्शनास येत आहे. पीक विमा संरक्षण घेतलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास पीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना 72 तासांमध्ये देणे आवश्यक आहे. (Report Crop Damage To The Department Of Agriculture Within 72 Hours bam92)

शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या जोखमेच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास विमा संरक्षण प्राप्त होते.

विमा कंपनीस (Insurance Company) शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबरनुसार बाधित पीक व बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत क्रॉप इन्श्युरन्स व संबंधित विमा कंपनीचे टोल फ्री क्रमांक, बँक, कृषी व महसूल विभाग (Revenue Department) यांना कळवावे. नुकसान कळवताना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशिल कळविणे बंधनकारक आहे. अधिक तपशीलासाठी तत्काळ नजीकच्या विभागीय कृषीसह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयाशी सपर्क साधावा, असे आवाहन सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांनी केले आहे.

Report Crop Damage To The Department Of Agriculture Within 72 Hours bam92

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: "इस्लाम हा एक न्याय्य धर्म, तो समाजावर लादला पाहिजे..." विद्यार्थ्याच्या खळबळजनक विधानामुळे सोशल मीडिया पेटले

X Overpayment Issue : इलॉन मस्कने कर्मचाऱ्यांचा पगार मागितला परत; कोट्यवधींच्या रक्कमेसाठी काढली नोटीस,जाणून घ्या काय आहे प्रकरण

Babar Azam: 'मी असतो तर त्वरित कॅप्टन्सी सोडली असती...', माजी कर्णधाराने बाबरवर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT