संग्रहित छायाचित्र sakal
सातारा

दफ्तर जप्त प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद

पोलिस अधिक्षक सातारा, पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर आणी पोलिस उप अधिक्षक दहिवडी यांचेकडे लेखी तक्रार दाखल करुन वरील सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले

रुपेश कदम

दहिवडी : बिजवडी (ता. माण) चारा छावणीतील भ्रष्टाचार प्रकरणी दहिवडी न्यायालयाचे आदेशाने गुन्हा नोंद असून चारा छावणी दफ्तर तपासणी प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे असा आरोप संजय भोसले यांनी केला आहे.

संजय भोसले म्हणाले, सदर गुन्ह्याच्या तपासकामी चारा छावणी रोज किर्द (जमा, खर्च) रजिस्टर हे यशवंत म्हंकाळ गाढवे (वय : ५३ वर्षे, रा.बिजवडी ता.माण) यांनी समक्ष हजर केलेने ते दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. असे दहिवडी पोलिसांनी नमूद केले. त्यामुळे या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेले आरोपी वि. का. सेवा सोसायटीचे चेअरमन यशवंत नामदेव शिनगारे व सचिव विकास दिनकर भोसले यांना ३० मे २०२१ रोजी न्यायालयामध्ये हजर करुन त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

याबाबत काही कागदपत्रे आम्हाला मिळून आलेली असून संबंधित यशवंत गाढवे यांनी स्वत:च १ जून २०२१ रोजी पोलिस अधिक्षक सातारा, पोलीस महानिरिक्षक कोल्हापूर आणी पोलिस उप अधिक्षक दहिवडी यांचेकडे लेखी तक्रार दाखल करुन वरील सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी अर्जामध्ये पुढे म्हटले आहे की, गु.र.नं. ६२/२०२१ दहिवडी पो.स्टे. येथे २९ मे २०२१ रोजी माझेकडून पोलिसांनी धमकावत खोटा रजिस्टर जप्तीचा पंचनामा केलेला असून या गंभीर प्रकाराची चौकशी व्हावी.

यावरुन दहिवडी पोलिसांचा संबंधित गुन्ह्याचा सुरु असलेला तपास संशयाच्या भोवर्‍यात अडकला असून जिल्हा पोलिस प्रमुख सदर प्रकार गंभीरतेने घेतील काय? असे संजय भोसले यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

IND vs WI, 3rd ODI: अंशुल कंबोजचं भारतासाठी पदार्पण, सिराजलाही संधी; पण दोघांना वगळलं; पाहा Playing XI

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

SCROLL FOR NEXT