Accident sakal
सातारा

सातारा: दुचाकी-चारचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

दरम्यान अपघातानंतर दुचाकी गाडी जाग्यावरच जळून खाक झाली.

फिरोज तांबोळी

औंध : घाटमाथा ते पुसेसावळी रस्त्यावर त्रिमलीनजीक दुचाकी व चारचाकी गाडीचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 45वर्षीय दुचाकी स्वार जागीच ठार झाले. दरम्यान अपघातानंतर दुचाकी गाडी जाग्यावरच जळून खाक झाली.

याबाबत घटनास्थळ व औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, कैलास बाजीराव गायकवाड वय 45हे वर्धन अँग्रो कारखान्यातील आपली डयुटी संपवून रायगाव ता. कडेगाव या आपल्या गावी निघाले होते . ते त्याठिकाणी इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होते.

कारखान्यापासून दिड ते दोन किलो मीटर अंतरावर आपल्या दुचाकी गाडी क्रमांक MH10CS471वरून जात असताना समोरुन येणाऱ्या MH10CN902या अल्टो800या गाडीने समोरासमोर जोरदार धडक देत कैलास गायकवाड यांची दुचाकी सुमारे शंमर फुट फरफटत नेली यामध्ये त्यांचा उजवा पाय गुडघ्यापासून खाली पुर्णपणे तुटून पडला होता तसेच मेंदूला ही जखम झाली होती.त्यामुळे त्यांचा जागेवरच मूत्यू झाला तर दुचाकी ही जाग्यावर पेटून जळून खाक झाली तर चारचाकी गाडीने ही दोन तीन कोलांट उडया खाल्या व रस्त्याच्या बाजूकडील खडड्यात जाऊन चारचाकी गाडी पडली.

दरम्यान घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ व पोलीस पोहचण्या अगोदरच चारचाकी गाडीतील ड्रायव्हर व अन्य व्यक्ती तिथून पसार झाल्या होत्या. कैलास गायकवाड यांच्या अपघाती मुत्त्यु मुळे कारखाना परिसरात शोककळा पसरली होती. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून अधिक तपास बी.एन.जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Airport Emergency : कोल्हापूर विमानतळावर ‘इमर्जन्सी लँडिंग’, काय होती मेडिकल इमर्जन्सी; पुढे काय झाल?

TET Exam Supreme Court : टीईटी परीक्षेबाबतचा ‘सर्वोच्च’ निकाल बहुचर्चित, शिक्षक वर्गात धास्ती शासनाकडे पुनर्विचार याचिकेची मागणी

Pratik Shinde Car Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; रिल स्टार प्रतीक शिंदेची फॉर्च्युनर क्रेटाला धडकली, तीन गाड्यांचे लाखोंचे नुकसान

Maharashtra Rain : मान्सून जाता जाता झोडपणार, महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची शक्यता; येत्या २-३ दिवसात कसं असेल वातावरण?

Bachchu Kadu: बोगस कृषी औषध निर्मात्या कंपन्या गुजरातच्या : बच्चू कडू, देवळीत दिव्यांग, शेतकरी, शेतमजुरांचा मेळावा

SCROLL FOR NEXT