उदयनराजे भोसले sakal
सातारा

सातारा परिसर होणार लोडशेडिंगमुक्त- उदयनराजे भोसले

या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत

उमेश बांबरे -सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा नगरपालिकेच्या पॉवर हाऊस येथील जागेत २० मेगावॉट वीजनिर्मितीचे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी महावितरणच्या माध्यमातून पाच कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या कामाची लवकरच सुरुवात होणार असून, या उपकेंद्रामुळे सातारा शहर आणि लगतचा ग्रामीण परिसर लोडशेडिंगमुक्त होणार आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

सातारा शहराच्या विकासासाठी धोरणात्मक पावले उचलण्याचे संकेत इनोव्हेटीव सातारा या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले होते. या प्रकल्पाची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली आहे. सातारा शहर आणि लगतच्या ग्रामीण भागातील लोडशेडिंगची समस्या सोडवण्यासाठी महावितरण विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नामुळे महावितरणने सातारा आणि ग्रामीण भागासाठी २० मेगावॉटचे वीजनिर्मिती करणारे उपकेंद्र मंजूर केले आहे.

नगरपालिकेच्या मालकीचे यवतेश्वर घाट परिसरात पॉवर हाऊस जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे वीज निर्मितीचे छोटेखानी युनिट चालवले जात होते. या परिसरात २० मेगावॉट उपकेंद्रासाठी १५ गुंठे जागा देण्याचे धोरण निश्चित केले आहे. या उपकेंद्राच्या निर्मितीमुळे सातारा शहर आणि परिसर येथील पुढील २५ वर्षांसाठी विजेची समस्या सुटणार आहे. उदयनराजेंनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले, की कण्हेर पाणीपुरवठा योजना व कास पाणीपुरवठा व तत्सम कारणासाठी जी वीज शेंद्रे एक्स्प्रेस फिडरकडून घ्यावी लागते. त्याचा सर्वोत्तम पर्याय या उपकेंद्रामुळे होणार आहे. विविध पाणी उपसा योजनांनाही येथून वीज कनेक्शन देणे शक्य होणार आहे.

महावितरण व सातारा नगरपालिका यांच्या समन्वयातून हा प्रकल्प उभारला जात असून, या प्रकल्पाचा सातारा शहरासाठी आणि शहर ग्रामीण भागातील लघुउद्योजकांसाठी विशेष फायदा होणार आहे. एकीकडे लोडशेडिंगमुळे सातारा औद्योगिक वसाहतीचे नुकसान होत आहे. मात्र, २० मेगावॉटच्या वीजनिर्मिती उपकेंद्रामुळे शहरात छोट्या लघुउद्योजकांना मोठा वाव मिळणार आहे. विकास हे सातारा विकास आघाडीचे मुख्य धोरण राहिले आहे. कास धरणाच्या उंची प्रकल्पानंतर २० मेगावॉट उपकेंद्र मंजूर करून देणे हे आमचे उद्दिष्ट राहिले होते. या प्रकल्पात महावितरण विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे हे शक्य झाले आहे. साताऱ्यात कोणत्याही मूलभूत आणि पायाभूत सुविधांची कमतरता भासणार नाही. याकरिता आम्ही वचनबद्ध आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT