Minister Balasaheb Patil esakal
सातारा

...तर सातारा जिल्ह्यात कडक निर्बंध लावावे लागतील

सिद्धार्थ लाटकर

सातारा : राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी होतं असताना सातारा जिल्ह्यात अचानक गेल्या दोन दिवसांत पॉझिटिव्हीटाचा दर वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्यातील जनतेला आवश्यकता असेल तर घरा बाहेर पडा. अन्यथा पुन्हा कडक निर्बंध लावण्याची वेळ येऊ ठेपेल अशी चिंता व्यक्त केली आहे. (satara-balasaheb-patil-appeals-citizens-wear-mask-lockdown)

नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. दरम्यान गत 24 तासांत सातारा जिल्ह्यात सहा हजार 505 नागरिकांच्या तपासणीअंती 497 नागरिकांना काेविड 19 ची लागण झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जनतेस आवाहन करताना कोरोना रूग्ण वाढीचा आलेख सातारा जिल्ह्यात वाढत आहे. हा आलेख असाच वाढत राहिला तर आपण ज्या पातळीवर आहोत त्यावर बाधितांचा आकडा पुढं गेल्यास पुन्हा आपल्याला कडक निर्बंध लावले जातील अशी चिंता व्यक्त केली. त्यामुळे नागरीकांनी गर्दी न करता काळजी घेऊन कोरोनाची मार्गदर्शक तत्वांचे पालन करावे. नागरिकांनी बाजारपेेठेत मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.

दरम्यान जिल्ह्यात रविवारी रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार 497 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. याबराेबरच 9 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 15 (8505), कराड 106 (27265), खंडाळा 16 (11739), खटाव 73 (19457), कोरेगांव 35(16690), माण 23(13130), महाबळेश्वर 12(4275), पाटण 22(8393), फलटण 36 (28319), सातारा 135 (40241), वाई 17 (12605) व इतर 7 (1312) असे आज अखेर एकूण 191931 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (192), कराड 3(801), खंडाळा 0 (149), खटाव 3 (484), कोरेगांव 0 (382), माण 1(260), महाबळेश्वर 0 (45), पाटण 1 (196), फलटण 0 (280), सातारा 1 (1225), वाई 1(331) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4345 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT