सातारा

शिवसेनेच्या माजी जिल्हाप्रमुखावर खंडणी, जातीवाचक शिवीगाळचा गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

सातारा : रस्त्याच्या पॅचिंगच्या कामाबाबत तक्रार घेऊन गेलेले शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील यांना साेमवारी (ता.15) नगरपालिका कार्यालयातच ठेकेदाराकडून मारहाण झाली. या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
 
नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांची पत्नी सुवर्णा पाटील या सातारा पालिकेची माजी नगरसेविका आहेत. त्या भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणूनही उभ्या होत्या. श्री. पाटील हे त्यांच्या वॉर्डच्या परिसरातील कामांच्या दर्जाबाबत नेहमीच जागरूक असतात. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत त्यांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. काही निकृष्ट कामे होत असतानाही त्यांनी ती बंद पाडली होती. 
जिल्हा शासकीय रुग्णालय परिसरातील एका रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याबाबत त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे यापूर्वी तक्रारी केल्या होत्या. या रस्त्याचे पॅचिंगचे काम सुरू होणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, तसेच पाऊस नसतानाच काम सुरू करावे, अशी मागणी घेऊन ते नगरपालिका कार्यालयात गेले होते. संबंधित अधिकाऱ्यांकडे ते तक्रार करत असतानाच पालिकेतील ठेकेदार गणेश पवार हे त्या ठिकाणी आले. रस्त्याच्या कामाच्या तक्रारीवरून त्यांची व श्री. पाटील यांची जोरदार बाचाबाची झाली. या वेळी पवार याने नरेंद्र पाटील यांना हाताने मारहाण केली. पालिकेतील अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून गणेश पवार याला बाजूला केले. या प्रकाराचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र या प्रकाराची चर्चा सुरू होती.

खंडणी, जातीवाचक शिवीगाळीची तक्रार

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता; परंतु गणेश पवार याने नरेंद्र पाटील यांच्याविरुद्ध सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली. नरेंद्र पाटील यांनी 50 हजार रुपयांची खंडणी मागून जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार श्री. पाटील यांच्यावर खंडणी व जातीवाचक शिवीगाळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

विधानपरिषदेसाठीची चक्र फिरवताहेत पृथ्वीराज चव्हाण? ज्येष्ठ नेते उंडाळकरांच्या मुलाच्या नावाची चर्चा

सातारा जिल्ह्यातील या पालिकेने दिली बियाणांसाठी 50 टक्के सूट 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tea Dispute: भारताचा नेपाळला मोठा दणका! सीमेवर १३ लाख किलो चहा खोळंबला; नव्या नियमांमुळे व्यापारावर परिणाम

Medha Kulkarni: ''मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पुढे बसू नका'', पुण्यात मेधा कुलकर्णींचा अपमान? मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोहळा, अभिमन्यू पवारांवर आरोप

Latest Marathi News Live Update : वादग्रस्त पवना धरण बंदिस्त पाईप लाईनचा अंतिम निर्णय येत्या 3 जुलै ला सुटणार : महेश लांडगे भाजपा आमदार

Pune: पाणीकपातीने सोसायट्यांचे बजेट कोलमडले; कात्रज-कोंढवा परिसरातील परिस्थिती गंभीर; देखभाल शुल्कात प्रतिमहिना लाखोंची वाढ

IND vs IRE 1st T20I: वैभव सूर्यवंशी पदार्पणात पाच मोठे विक्रम! पहिली धाव घेताच पराक्रम करणार; सचिनसह रोहितचा विक्रम मोडणार

SCROLL FOR NEXT