coronavirus update satara 
सातारा

सातारा : बाधितांची संख्या घटली; जाणून घ्या पाॅझिटिव्हीटी रेट

सिद्धार्थ लाटकर

सातारा : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या (covid19 patients) संख्येचा आलेख घसरत चालला आहे. जिल्ह्यात आज (मंगळवार) 788 कोरोनाबाधित रुग्णसंख्या आढळली आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान रुग्ण संख्या कमी हाेत असल्याने आज अखेर जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट हा 6.71 इतका झाल्याचे स्पष्ट हाेत आहे. (satara-coronavirus-news-positivity-rate-decreased-covid19)

गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांचा पॉझिटिव्‍हिटी रेट कमी झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या टप्‍प्यात बाधितांच्या संख्येची साखळी तुटताना दिसत आहे. तसेच, जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण कमी होत आहे. तसेच, गेल्या १५ दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याने दिलासादायक चित्र दिसून येत आहे. याचबरोबर गृह विलगीकरणातही रुग्णांचा रिकव्हरी रेट चांगला असल्याने इतर रुग्णालयांवरील ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

बाधितांची संख्या घटत असल्याने ग्रामीण भागातील कंटेन्मेंट झोन कमी केले आहेत. तसेच, कोरोना केअर सेंटर, ग्रामीण रुग्णालयांमधील रुग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज 11 हजार 742 नागरिकांच्या तपासणीअंती 788 नागरिकांना काेविड 19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.

दरम्यान सातारा जिल्ह्यात साेमवारी १७ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हाेता. तसेच एक हजार १३९ नागरिकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. नागरिकांना मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतराचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Covid 19 testing

प्रत्येक नागरिकाने घराबाहेर पडताना मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळले पाहिजे व वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे , असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनीही केले आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्ण आढळण्याची संख्या कमी झाली आहे. कुणीही कोरोना गेला, असे समजू नये प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

कोरोना अपडेट्‌स

एकूण नमुने : 110430

एकूण बाधित : 186124

घरी सोडण्यात आलेले रुग्ण : १,७४,४३२

उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण : ४,२२१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT