Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

सातारा-सोलापूर बसवर दगडफेकप्रकरणी आटपाडी तालुक्‍यातील पाच संशयित ताब्यात

सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (जि. सातारा) : पंढरपूर-सातारा रस्त्यावर म्हसवडजवळच्या पिलीव घाटात एसटी बसवर दगडफेक करणाऱ्या टोळीतील आठपैकी पाच संशयितांना माळशिरस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

मंगळवारी (ता. 19) रात्री अकराच्या सुमारास सातारा-पंढरपूर रस्त्यावर पिलीव घाटात कोरेगाव आगाराच्या सातारा-सोलापूर बसवर सात ते आठ युवकांकडून दगडफेक करण्यात आली होती. यामध्ये बसच्या काचा फुटून बसचालक जखमी झाला होता. तसेच एक दुचाकीस्वारही जखमी झाला होता. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. दोन्ही बाजूची वाहने थांबविण्यात आली होती. म्हसवड व माळशिरस पोलिस ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत संशयित पसार झाले होते.

याबाबत एसटी चालक जिवराज सुभाष कदम (रा. पांढरवाडी, ता.खटाव, जि. सातारा) यांनी माळशिरस पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके तपास करत होते. तपासादरम्यान पोलिसांनी आटपाडी, म्हसवड, नातेपुते, वेळापूर, पंढरपूर या परिसरातील अनेक गावांतून गोपनीय माहिती काढली. त्यामध्ये देवापूर (ता. माण) व आटपाडी (जि. सांगली) येथील संशयितांनी हा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आटपाडी तालुक्‍यातील राजेवाडी तलावाच्या परिसरात मासे खरेदीचे व्यापारी असलेचे भासवून देवापूर (ता. माण) व राजेवाडी येथे सापळा लावला. 

गुन्ह्यामध्ये आठ संशयित निष्पन्न झाले असून, त्यापैकी पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन संशयित अल्पवयीन आहेत. सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलिस अधीक्षक अतुल झेंडे, अकलूजचे पोलिस अधिकारी निरज राजगुरू, माळशिरस पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक शशिकांत शेळके, हवालदार पंडित मिसाळ, दत्ता खरात, समाधान शेंडगे, सोमनाथ माने, सतीश धुमाळ, अन्वर आतार हे या कारवाईत सहभागी होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी VVIP नाहीत, तातडीने सुनावणी घ्या; याचिकाकर्त्याच्या मागणीवर सुप्रीम कोर्टाने फटकारलं, म्हणाले...

Aditya Thackeray Shares Student Video : कोल्हापुरातील विद्यार्थ्याचा व्हिडिओ आदित्य ठाकरेंकडून शेअर; फडणवीसांना थेट सवाल, उद्धव ठाकरेंशीही फोनवरून चर्चा

Jalgaon News: तामिळनाडुचे मुख्यमंत्री विजय यांचं फेक अकाउंट, जळगाव कनेक्शन समोर; होमगार्डची चौकशी

Marathi News Live Updates : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात ACB ची धाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT