Crime News 
सातारा

पोलिस ठाण्‍यातच युवतीने स्वतःच्या गळ्यावर काचेने केले वार

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : वाई येथील युवकावर झालेल्या खुनी हल्‍ल्याबाबत पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलेल्या युवतीने पोलिस ठाण्याच्या स्वच्छतागृहात शनिवारी (ता. २६) दुपारी आत्महत्‍येचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (satara-crime-news-girl-tried-to-beat-herself-in-bhuinj-police-station)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की दोन दिवसांपूर्वी वाई येथील युवकावर असले येथील हणमंत किसन कणसे यांच्या घरात अज्ञात तिघांनी दांडक्याने व धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले. तिघे मारेकरी तेथे येऊन युवकास मारहाण करीत असताना संबंधित युवती व तिचे वडील हणमंत कणसे तेथे टीव्ही पाहात होते. त्यामुळे या युवतीला व तिच्या वडिलांना चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते.

त्यावेळी त्या युवतीस पोलिस महिला विश्रामगृहात चौकशीसाठी नेले. चौकशी चालू असताना युवती स्वच्छतागृहात गेली. तेथील खि़डकीची काच फोडून गळा चिरून आत्महत्या करण्याचा तिने प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तिला पकडून उपचार केले. तिच्या गळ्याला आठ टाके पडले असून तिला रुग्णालयातून उपचारानंतर सो़डण्यात आले.

तिला रविवारी पुन्हा तपासासाठी बोलविण्यात आले. तिच्यावर पोलिस ठाण्यात आत्महत्‍येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप भंडारी तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT