Satara Latest Marathi News 
सातारा

धक्कादायक! कोयनेत बांधकाम विभागातील लिपिकाची गळफास घेऊन आत्महत्या

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना प्रकल्पात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्त्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. 

कोयना बांधकाम विभाग क्रमांक-1 या कार्यालयात लिपिक-टंकलेखक पदावर गतवर्षीपासून काम करणाऱ्या संतोष बंडू कुंभार (वय- ४०, रा. देशपांडेवाडी – बोपोली, ता. पाटण) या कर्मचाऱ्याने कोयना प्रकल्पाच्या शासकीय वसाहतीतील आपल्या राहत्या घरी 29 मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास गळफास लावून घरात कोण नसताना आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनेची नोंद कोयना पोलिसात झाली असून फौजदार संजय चव्हाण तपास करत आहेत.

संतोष कुंभार हे देशपांडेवाडी-बोपोली येथील रहिवाशी आहेत. संतोष हे जून २०२० मध्ये जलसंपदा विभागातील कोयना बांधकाम विभागात लिपिक पदावर कामास सुरुवात केली होती. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कोयना येथील शासकीय निवास्थानात कुंभार कुटुंबीय सध्या वस्त्यव्यास आहे. देशपांडेवाडी-बोपोली येथील संतोष कुंभार हे पत्नी व मुलांसह कोयनानगर येथे राहत होते. सोमवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर कोयनानगर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. रात्री उशिरा घटनेची नोंद करण्याचे काम पोलीस स्टेशनमध्ये चालू होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT