Satara Latest Marathi News Satara Crime News 
सातारा

दागिने चोरीप्रकरणी दोन महिलांना अटक; कऱ्हाड पोलिसांची कारवाई

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधील दोन तोळ्यांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिला चोरट्यांना तालुका पोलिसांनी जेरबंद केले. चोरीस गेलेले एक लाख 11 हजारांचे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. सुप्रिया पिसाळ यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पिसाळ रिक्षाने करवडीला निघाल्या होत्या. त्या करवडीत उतरल्यावर त्यांनी पर्समधून दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र, काळ्या मण्यातील सोन्याची वाटी, मणी जोडवी असा तब्बल एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. वडापच्या रिक्षात शेजारी बसलेल्या दोन अनोळखी महिलांवर त्यांचा संशय होता. त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात त्याची माहिती देत गुन्हा दाखल केला. 

तालुका पोलिसांनी संबंधित दोन महिलांना गुन्ह्यात अटक केली. त्यांच्याकडून दोन तोळ्यांच्या सोन्यासह एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तालुका पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार शशिकांत काळे, सज्जन जगताप, अमित पवार, उत्तम कोळी, महिला पोलिस पूनम चव्हाण यांनी तपासात सहभाग घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दुबार मतदारांचे झेडपीसाठी तिसऱ्यांदा मतदान! सोलापूर जिल्ह्यात ३८,९०९ पैकी १८,१४५ दुबार मतदार सापडलेच नाहीत; नगरपालिका, महापालिका क्षेत्रातही ५३००० दुबार मतदार

Shukraditya Rajyog 2026: शुक्रादित्य राजयोग! गुरुवारी पैशांच्या बाबतीत या राशींचे नशीब चमकरणार; पाहा आजचे करिअर राशीभविष्य

मोठी बातमी! जिल्हा परिषदांच्या मतदानापूर्वी लाडकी बहीण अन् शेतकऱ्यांना मिळणार १५०० अन्‌ २००० रुपये; ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेसाठी मतदान

Indian Army Day Special : प्राध्यापकाची नोकरी सोडून रणांगण गाजवले; कर्नल साळुंकेंनी असा केला होता पाकच्या मालगाडीचा घातपात!

आजचे राशिभविष्य - 15 जानेवारी 2026

SCROLL FOR NEXT