सातारा

...यामुळे गेल्या पाच वर्षांपासून शेतकऱ्यांची आयएसआय मार्क ठिबककडे पाठ

विकास जाधव

काशीळ : पाणी बचत, वीजबिल बचत व उत्पादन वाढ या दृष्टीने फायदेशीर ठरू लागल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ठिबक सिंचनाकडे कल वाढला आहे. मात्र, मागील चार ते पाच वर्षांपासून ठिबक संचाचे वाढत असलेले दर, शासनाकडून रखडू लागलेले अनुदान यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा नॉन आयएसआय ठिबक सिंचन संचाकडे कल वाढला असल्याचे दिसून येत आहे.
 
माण, खटाव, फलटण, खंडाळा व कोरेगाव तालुक्‍यांत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने पाणी उपलब्धतता वाढू लागली आहे. परिणामी जिल्ह्यात बागायती क्षेत्रात वाढ झाली आहे. पश्‍चिम भागात पाणी उपलब्ध असल्याने ऊस, आले, हळद, स्ट्रॉबेरी, केळी तसेच भाजीपाला केला जात आहे. यामुळे दिवसेंदिवस पाण्याची मागणी आहे, तसेच दुष्काळी तालुक्‍यात पाण्याचा वापर वाढला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाण्याचा वापरही बेसुमार होऊ लागल्याने पाणी बचतीसाठी, तसेच उत्पादनवाढीसाठी कृषी विभागाकडून ठिबक सिंचन वापर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. हे संच बसवल्यावर कृषी विभागाकडून अनुदानही दिले जात आहे. यामुळे मागील पाच ते सहा वर्षांपासून ठिबक सिंचन संच बसवण्याकडे कलही वाढला आहे. मात्र, मागील तीन ते चार वर्षांपासून ठिबक संचाचे वाढलेले दर, तसेच शासनाकडून अनुदानास होणारा विलंब यामुळे शेतकऱ्यांचा नॉन आयएसआय ठिबक सिंचन संच बसवण्याकडे कल वाढला आहे. यामुळे पिकांना दिल्या जाणाऱ्या पाण्याचे शास्त्र जुळत नसल्यामुळे अपेक्षित उत्पादन वाढ होत नाही. मात्र, तरीही शेतकऱ्यांचा हे संच बसवण्याकडे कल वाढत आहे. यामुळे अनेक नामांकित कंपन्यांसह लोकल कंपन्यांही ठिबक संच निर्मितीत उतरल्या आहेत. पाट पाण्याचा होणारा त्रास व पाण्याचा अपव्यय, तसेच आयएसआय ठिबक संचाला होत असलेला वाढीव खर्च याचा मध्य म्हणून नॉन आयएसओ ठिबक संच परवडत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एकरी आयएसआय ठिबकला सर्वसाधारण 45 हजार खर्च येतो, तर नॉन आयएसआयला 20 ते 22 खर्च येतो. मात्र, आयएसआय ठिबकमुळे 40 टक्केपर्यंत उत्पादन वाढ होते. नॉन आयएसआय ठिबकमुळे इतके उत्पादन वाढणे शक्‍य होत नाही. कारण नॉन आयएसआय ठिबकला वापरले जाणारे ड्रीपर हे तंत्रानुसार नसल्यामुळे समान पाणी पडत नाही. त्याचबरोबर त्यातून दिली जाणारी खतेही समान पडत नाही. याचा परिणाम पिकांच्या वाढीवर व उत्पादनावर होतो. यामुळे ठिबक संचाचा मुख्य हेतू साध्य होत नाही. यासाठी सरकारने नॉन आयएसआय संचाच्या लॅटरला किमान आयएसआय ठिबक संचाचे ड्रिपर वापरले जावेत. यामुळे पाण्याचे शास्त्र साध्य होण्याबरोबरच उत्पादन वाढ होणे शक्‍य आहे. 

संचाला 80 टक्के अनुदानाची मागणी 

ठिबक सिंचनाचा मूळ हेतू पाण्याचा योग्य वापर आणि शेतकऱ्यांची उत्पादन वाढ हा आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. यासाठी ठिबक सिंचनाचा वापरात वाढ करणे आवश्‍यक आहे. आयएसआय ठिंबकमुळे 40 टक्केपर्यत उत्पादन वाढ होणे शक्‍य आहे. यामुळे सरकारने ठिबक संचाला एकरी 80 टक्के अनुदान देण्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेचा अध्यादेश निघाला नसल्यामुळे हे अनुदान अजूनतरी मिळत नाही. ठिबक संचाला घोषणेप्रमाणे 80 टक्के अनुदान दिले जावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.


दहावी नंतर करिअर फक्त कसे निवडावे नव्हेतर कसे घडवावे यासाठी जॉईन करा सकाळ आणि दिशा अकॅडमी, वाई आयोजित वेबिनार

निधी रखडला.. घरकुलाचे स्वप्नही लांबले!

शेतकरी आनंदले; दुष्काळी खटावसह माण तालुक्‍यात दमदार पाऊस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हार मानणार नाही, पुन्हा नव्याने सुरुवात करु' कॅनडातील कॅफेवरील गोळीबानंतर कपिल शर्माची प्रतिक्रिया

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'उंडवडी सुपे येथील अपघातात दाेनजण जागीच ठार'; कार व दुचाकीचा भीषण अपघात

Sangli : शाळेय विद्यार्थिनीला जबरदस्तीने लैंगिक अत्याचार प्रकरणी नवी अपडेट समोर, पळालेल्या संशयितांना अटक; त्यादृष्टीने सखोल तपास

Latest Marathi News Updates : भारतीय अंतरिक्षवीर शुभांशु शुक्ला १४ जुलैपासून पृथ्वीवर परतीच्या प्रवासाला सुरुवात करतील - नासा

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT