Satara Latest Marathi News 
सातारा

Good News : खासगी शाळा शैक्षणिक फी कमी करणार; पालक संघाच्या लढ्याला मोठं यश

प्रशांत घाडगे

सातारा : गेल्या वर्षभराच्या काळात शाळा बंद असूनही जिल्ह्यातील खासगी शाळा पालकांना संपूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावत असून, खासगी शाळा चालकांच्या मनमानीविरुद्ध जिल्ह्यातील पालक एकत्रित येत पालक संघाच्या वतीने लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याची दखल घेत महाराष्ट्र राज्य खासगी शाळा संघटनेने पालक संघाशी चर्चा करत फी कमी करण्याबाबत सकारात्मकता दर्शविली आहे. याबाबत पुढील काही दिवसांत निर्णय घेण्याचे आश्‍वासन असोसिएशनने पालकांना दिले आहे. 

दोन दिवसांपूर्वी पालक संघाच्या वतीने संपूर्ण फीची मागणी करणाऱ्या खासगी शाळांविरोधात डिजिटल मोहीम राबविताना "जेवढी सेवा तेवढेच पैसे' घ्यावे, अशीही मागणी केली होती. या विरोधात सर्व पालकांनी एकत्र येत पालक संघाची स्थापनाही केली. पालकांची मागणी रास्त असल्याने सर्वच नागरिकांचा पाठिंबा मिळत असल्याने खासगी शाळांच्या विरोधात पालक एकवटल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे असोसिएशनने बोलविलेल्या बैठकीत फीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे पालक संघाचे प्रशांत मोदी यांनी सांगितले. या बैठकीप्रसंगी खासगी शाळा संघाचे अमित कुलकर्णी, राजेंद्र चोरगे, पालक संघाचे रितेश रावखंडे, कल्पेश गुजर व इतर पालक उपस्थित होते. 

कोरोनाचा प्रादुर्भाव डिसेंबरपासून कमी होताच सुरुवातीला नववी, दहावी आणि त्यानंतर पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग सुरू केले. परंतु, केवळ दीड महिन्यात पुन्हा कोरोना वाढल्याने शाळा बंद केल्या. आधीच कोरोनामुळे आर्थिक स्थिती बिघडलेली असताना ऑनलाइन शिक्षणासाठीही पालकांना इंटरनेट व नवीन मोबाईलसाठी भुर्दंड बसला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांनी "जेवढी सेवा तेवढेच पैसे' घ्यावेत, अशी आग्रही मागणी पालकांनी केली. तसेच अनेक संस्थाचालक शिक्षकांचा पगार, लाइट बिले अशी कारणे पुढे करून पालकांना पूर्ण फी भरण्यासाठी दबाव आणत आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये नर्सरी, ज्युनियर केजी व इतर लहान गटातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचे सुमारे 25 ते 50 हजारांची मागणी करत असल्याचाही मुद्दा पालकांनी बैठकीत मांडला. यावेळी असोसिएशनने पुढील आठड्याभरात सर्व पालक व खासगी शाळांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरू करा... 

पालकांनी पूर्ण फी भरली नसल्याने अनेक खासगी शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. या प्रसंगी फीअभावी खासगी शाळांनी ऑनलाइन वर्ग बंद केलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा शिक्षण सुरू करावे, असे आवाहन असोसिएशनने केले आहे. तसेच कोणत्याही खासगी संस्थेने फीसाठी दबाव टाकणे गंभीर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT