सातारा : गृहमंत्र्यांच्या नव्या निर्णयाचा लाभ 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जिल्ह्यातील 426 अधिकारी व कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्यांना कार्यालयीन कामकाज मिळाले आहे. त्याचबरोबर सवलत मिळाली की लगेच दांडी टाकायची, ही मानसिकता न दाखवता या कालावधीतही कामावर येण्याच्या जबाबदारीची जाणीव जिल्ह्यातील 55 वर्षांवरील बहुतांश पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखविली आहे. त्यामुळे सातारा पोलिस खरोखरच "फायटर' ठरत आहेत.
कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेले आहे. त्याला रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनही लागू केला आहे. कोरोनाविरुद्धच्या या लढ्यामध्ये पोलिस सुरवातीपासूनच लढवय्याचे काम करत आहेत. नागरिकांनी घरी बसण्याची गरज
असतानाही त्यांच्या मनात ते रुजवण्याचे काम करणे आवश्यक आहे. गोड बोलून प्रसंगी कायद्याचा धाक दाखवून राज्यातील पोलिस रस्त्यावर उभे राहून सुरवातीपासून ते काम करत आलेले आहेत. हे कर्तव्य बजावताना त्यांना नागरिकांच्या थेट संपर्कात यावे लागले. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पोलिस अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याचे समोर आले.
कोरोनाचा आजार हा अनेकांना धोकादायक नाही. राज्यातील रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणावरून ते स्पष्ट होत आहे. परंतु, 50 वर्षांवरील व ज्यांना हृदयरोग, मधुमेह, कर्करोग, किडनीचे विकार आहेत, त्यांना कोरोनाची बाधा त्रासदायक ठरू शकते,
हे आत्तापर्यंतच्या एकूण उपचारांवरून समोर आले आहे. नागरिकांच्या थेट संपर्कात येणाऱ्या पोलिसांचा धोका टाळण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी करून गृहमंत्र्यांनी 50 वर्षांवरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सवलत लागू केली. त्यामध्ये 50 वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजाची जबाबदारी द्यायची तसेच 55 वर्षांवरील कर्मचाऱ्यांना त्यांना आवश्यक असल्यास पगारी रजा देण्याचाही निर्णय त्यांनी घेतला.
राज्यातील कर्मचाऱ्यांप्रमाणे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळाला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 149 पोलिस अधिकारी व दोन हजार 573 कर्मचारी आहेत. त्यामध्ये 50 वर्षांवरील 426 अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यामध्ये पूर्वीचा आजार असलेले 198 जण आहेत. या सर्वांना कार्यालयीन कामावर नेमणुका देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये 55 वर्षांवरील 149 अधिकारी व कर्मचारी आहेत. त्यातील 73 जणांना पूर्वीचे वरीलप्रमाणे आजारही आहेत. या सर्वांना पगारी रजेवर जाण्याची संधी होती. पोलिस अधीक्षकांनी त्यांना तशा सूचनाही दिल्या. परंतु, केवळ 40 अधिकारी व कर्मचारीच कामावर नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पोलिसांनी कर्तव्याच्या जाणिवेतून कामावर हजर राहणे पसंत केल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पोलिसांनी खरोखरच सातारी लढवय्या बाणा दाखवून
दिला आहे.
अधीक्षकांनी आधीपासूनच घेतली काळजी
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी कोरोनाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चांगली काळजी घेतली होती. पोलिसांना फेसशिल्ड उपलब्ध करून देणे, प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देणे
असे उपक्रम त्यांनी राबविले होते. त्याचबरोबर पूर्वीचे आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना "ऑनफिल्ड ड्युटी'पासून दूर ठेवले होते. या सर्वांमुळेच जिल्ह्यात आत्तापर्यंत केवळ एकाच पोलिस अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा होऊ शकली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.