karad
karad 
सातारा

गणेशोत्सवातील खर्च विधायक कामांसाठी; 32 गावांत झाला निर्णय

गजानन गिरी

मसूर (जि. सातारा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाच्या आवाहनानुसार मसूरच्या गणेशोत्सव मंडळांनी ऐतिहासिक निर्णय घेत गावात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. गणेशोत्सवाचा खर्च विधायक कार्यासाठी करण्याचा निर्णय पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत, गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीतील 32 गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्याचा निर्णयही झाला. 

उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड व पोलिस दूरक्षेत्राचे उपनिरीक्षक प्रवीण जाधव यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. सहायक फौजदार गणेश भोसले, हवालदार सचिन देशमुख, अमोल देशमुख, सरपंच पंकज दीक्षित, उपसरपंच विजयसिंह जगदाळे यांच्यासह गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री. गोरड म्हणाले, ""मसूर ग्रामपंचायतीच्या सतर्कतेच्या कामगिरीमुळे कोरोनाचा कमी प्रमाणात प्रसार झाला. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अनुषंगाने जर संपर्क वाढला, तर आकडेवारी वाढू शकते. त्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करता सध्याच्या कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तो खर्च विधायक कार्यासाठी खर्च करा.'' 

या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला. काहींनी परंपरा खंडित होऊ नये म्हणून मंडळाच्या अध्यक्षांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला. एकता युवक, साईनाथ, विठ्ठल मंडळ या मंडळांनी गरजूंना अन्न, धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला. गणेश, क्रांती युवक, युवराज पाटील मित्रमंडळ, अष्टविनायक, जय जवान, धनराज मित्र या मंडळांनी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी मास्क व सॅनिटायझर वाटप करण्याचे घोषित केले. नवचैतन्य मंडळाने वाफारा मशिन वाटप करण्याचे जाहीर केले. शिवगणेश मंडळाने "विटामिन सी'च्या गोळ्यांचे वाटप करण्याचे जाहीर केले. 

यमाईमाता, यंग ग्रुप ऑफ शिवशक्ती, जयभवानी, युवराज पाटील या मंडळांनी ग्रामपंचायच्या कोविड फंडास मदत करण्याचा, तर क्रांतिवीर उमाजी मंडळाने पोलिस ठाण्याला पत्र्याचे शेड उभारण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. अजिंक्‍य मंडळाने पोलिस ठाण्यासह ग्रामपंचायतीला मदत करणार असल्याचे सांगितले. अंबिका मंडळाकडून वॉर्डमधील सार्वजनिक नळांना वॉश बेशीन व शुद्ध पाण्यासाठी एक्वा बसविण्यात येईल. 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT